जलसंधारण योजनांमध्ये महाराष्ट्र आघाडीवरजलशक्ती मंत्रालयाकडून भारतातील पहिली जलसंस्था जलगणना जाहीर

जलसंधारण योजनांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
जलशक्ती मंत्रालयाकडून भारतातील पहिली जलसंस्था जलगणना जाहीर
सारस एक्सप्रेस मुंबई 
जलसंधारण योजना राबविण्यात महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे. जलशक्ती मंत्रालयाने नुकताच भारतीय जलसंस्थांची पहिल्यांदाच गणना करुन एक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात जलसंधारण योजना सर्वाधिक प्रमाणात आणि यशस्वीरीत्या राबविण्यात यशस्वी ठरलेल्या राज्यांचा समावेश आहे. देशभरातील राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. यावर प्रकाश टाकणारा एक लेख....

महाराष्ट्राने देशाचा पश्चिम आणि मध्य भाग व्यापलेला आहे. त्यास अरबी समुद्राजवळ सुमारे 720 किलोमीटर लांब किनारपट्टी लाभलेली आहे. एकीकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगा पश्चिमेकडील राज्याला भौतिक आधार देतात, तर उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगा आणि पूर्वेकडील भरणरागड-चिरोली-गायखुरी पर्वतरांगा त्याच्या नैसर्गिक सीमा म्हणून काम करतात.
 
लोकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्रफळ या दोन्ही बाबतीत महाराष्ट्र हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. 2011 च्या जलगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11,23,74,333 आहे तर राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 3,07,713 किमी आहे.

जलसंधारण योजनांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. नुकतेच, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून 2018-19 मध्ये पहिली जलसंधारण जनगणना जाहीर करण्यात आली, ज्यात याचा उल्लेख आहे. देशात जिथे-जिथे पाणी साठवलं जाऊ शकतं, अशा सर्व जागांची गणना आणि सर्वेक्षण या अहवालासाठी करण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक तलाव आणि जलाशय आहेत, तर आंध्र प्रदेशात सर्वाधिक पाण्याच्या टाक्या आहेत आणि तामिळनाडूमध्ये सर्वाधिक तलाव आहेत.

जलसंधारणाच्या प्रयत्नांमध्ये महाराष्ट्र, देशात आघाडीवर आहे. जलसंधारणाच्या योजनांतर्गत, संपूर्ण देशाच्या तुलनेत, महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 97,000 पेक्षा अधिक जलस्त्रोत आहेत. यात, 96,343 (99.3%) ग्रामीण भागात तर उर्वरित 719 (0.7%) शहरी भागात आहेत. 

देशात असलेल्या सर्व जलस्त्रातांचा आकार, स्थिती, अतिक्रमणांची स्थिती, वापर, साठवण क्षमता, साठवण करण्याची स्थिती इत्यादि बाबींचा केलेला अभ्यास तसेच नैसर्गिक आणि मानवनिर्मित जलस्रोतांसह भारतातील जलसंपत्तीचा या अहवालात नोंद घेवून, जलशक्ती मंत्रालयाने, देशासमोर एक व्यापक डेटाबेस ठेवण्याचे उद्यिष्ठ साधले आहे.  

या अहवालानुसार, देशात २४,२४,५४० जलस्रोतांची गणना करण्यात आली आहे, त्यापैकी ९७.१% (२३,५५,०५५) ग्रामीण भागात आहेत आणि फक्त २.९% (६९,४८५) शहरी भागात आहेत. 59.5% (14,42,993) जलस्रोत तलाव आहेत, तर टाक्या (15.7%, म्हणजे 3,81,805), जलाशय (12.1%, म्हणजे 2,92,280), जलसंधारण योजना/पाझर तलाव/चेक बंधारे, 93% म्हणजे 2,26,217), तलाव (0.9%, म्हणजे 22,361) आणि इतर (2.5%, म्हणजे 58,884) आहेत.