मोदी सरकारच्या ९ वर्षाच्या कार्य काळातील उपलब्धी जन जन पर्यंत पोहोचवण्यासाठी महिनाभर महाजनसंपर्क अभियान राबविणार : खा. सुनिल मेंढे

मोदी सरकारच्या ९ वर्षाच्या कार्य काळातील उपलब्धी जन जन पर्यंत पोहोचवण्यासाठी महिनाभर महाजनसंपर्क अभियान राबविणार : खा. सुनिल मेंढे 
गोंदिया :-
देशाला परम वैभवाला नेण्यासाठी सज्ज असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कालावधीत देशाने सर्वच क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. गरीब कल्याणापासून ते जागतिक स्तरावर भारताचा सन्मान वाढविणाऱ्या अनेक गोष्टी या देशातील नागरिकांनी अनुभवल्या. मागील नऊ वर्षांत देशात आलेले परिवर्तन स्वातंत्र्यानंतर सत्तेत आलेल्यांना ही शक्य झाले नव्हते.
मला सांगण्यास अभिमान वाटतो की, लोकसभेत उपस्थित राहून, चर्चामध्ये भाग घेवून, सामान्य जनतेचे प्रश्न मांडून देशकल्याणाच्या सर्व योजनांमध्ये सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले. वर्ष २०१९ ते २०२३ या अवधीत शितकालीन सत्रातील - १००%, बजेट सत्र ९६%, मान्सून सत्र ९४% माझी उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला नऊ वर्ष पूर्ण होत आहेत. पहिल्यांदा पाच वर्ष देशाचे नेतृत्व केल्यानंतर, कामाची पावती म्हणून लोकांनी पुन्हा मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकून, त्यांच्या हाती देशाचे नेतृत्व दिले. सुरुवातीचे पाच वर्ष आणि मागील चार वर्षात जो काही विकासाचा झंझावात देशात आला, त्यामुळे देशातील सर्व सामान्य माणसांचे जीवन बदलून गेले आहे.

2014 मध्ये, जी अर्थव्यवस्था 2 ट्रिलियन डॉलर होती, ती 3.5 ट्रिलियन डॉलर करण्याची किमया मोदी सरकारने दाखविली. जगातल्या सर्व देशांमध्ये पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेवर देश झेप घेऊ शकला. व्होकल फॉर लोकल च्या माध्यमातून आत्मनिर्भरते कडे भारताची सुरुवात झाली. स्थानिक उत्पादनांवर भर देण्याच्या या घोषणेमुळे 35 लाखापेक्षा जास्त हातमाग विणकर आणि 27 लाखाहून अधिक हस्तशिल्प कारागिरांना ई-कॉमर्स पोर्टलच्या माध्यमातून थेट ग्राहकांशी जोडून देण्यात आले. 2015-16 मध्ये 2.5 लाख करोड रुपये खर्च झाले होते. तर 2023-24 मध्ये 10 लाख करोड यावर केंद्र सरकारने खर्च केले. परिवहन, राष्ट्रीय महामार्ग अशा सर्वच पायाभूत सुविधा मजबूत झाल्या. स्टार्ट अप इंडिया च्या माध्यमातून युवकांच्या आकांक्षांना भरारी देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 2023 मध्ये 97053 एवढ्या नोंदणीकृत स्टार्ट-अप संख्या आहे. लक्षात घेण्यासारखी बाब ही की, 2014 पर्यंत देशात केवळ 32 स्टार्ट-अप होते. लोकांच्या आरोग्याची काळजी घेत पंतप्रधान भारतीय जन औषध योजना सुरू केली गेली. त्या माध्यमातून 2023 च्या एप्रिल पर्यंत देशात 9307 जन औषधी केंद्र उभारले गेले आहे. यातून औषधांवर होणाऱ्या खर्चापैकी जवळपास 20 हजार कोटी पेक्षा जास्त रकमेची लोकांची बचत झाली आहे. जलजीवन मिशन ही क्रांतिकारी योजना आणून लोकांच्या घरापर्यंत नळाच्या माध्यमातून पाणी पोहोचविण्याचा संकल्प पंतप्रधानांनी पूर्ण केला. 2023 मध्ये 11.9 कोटी नळ जोडण्या देण्यात आल्या असून यावर सरकारने 70 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. देशात 100 नवीन जल मार्ग विकसित करून नवीन क्रांती घडविली आहे. जनधन योजनेच्या माध्यमातून आजच्या घडीला देशात 48 कोटी खाते उघडल्या गेली असून यात 56% महिला खातेदार आहेत. महाराष्ट्र ग्रामीण राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत होत असलेला गैरव्यवहार थांबवल्याने 40 हजार कोटीची बचत होऊन डिजिटल व्यवस्थेमुळे लाभार्थ्याना प्रत्यक्ष लाभ मिळणे शक्य झाले. सुगम्य भारतअभियान अंतर्गत शाळांचे आधुनिकीकरण, उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून 2023 पर्यंत दिलेल्या 31 कोटी 36 लाख गॅस जोडण्या सरकारचे कल्याणकारी पाऊल आहे. किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रति वर्ष 6000 रुपये देत 53 हजार 600 कोटी रुपये चा लाभ शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात आता केंद्र प्रमाणेच राज्य सरकारने हा सन्मान निधी देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने सन्मान होणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली तीन कोटीहून अधिक घरे, आयुष्यमान भारत योजना अंतर्गत 60 कोटी कार्ड धारकांनी पाच लाख पर्यंत उपचारासाठी मिळालेला विमा, कृषी निर्यातीत मागील नऊ वर्षात झालेली वाढ, संरक्षण क्षेत्रात 14 पटीने निर्यात वाढून 85 पेक्षा अधिक देशांना पुरविली जात असलेली संरक्षण सामग्री, एक देश एक शिधापत्रिका, G-20 देशांचे मिळालेले अध्यक्षपद, जीएसटी च्या माध्यमातून संकलित झालेला कोट्यावधीचा कर आणि थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये विविध लाभांचे जमा झालेले 28 लाख कोटी रुपये मोदींजी च्या कल्याणकारी दृष्टीचे दर्शन घडविणारे आहे
भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात एकूण १६४६ करोड खर्चाचे २८८ कि.मी. राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झालेले आहे. वैद्यकीय महाविद्यालयांना दोन्ही जिल्ह्यात मंजुरी याच कालावधीत प्राप्त झाली आहे. तसेच लोकसभा क्षेत्रात प्रधानमंत्री जनधन योजना ११,६१५२३, उज्वला योजना ८,३०४६३, आयुष्यमान भारत चे कार्डधारक ३,७३,९५५, प्रधान मंत्री आवास योजना १,३३,५९३,प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना १७,३२,८२५, किसान सन्मान योजना ४११८३९, महात्मा गांधी रोजगार गारंटी १,५०,४९४ लाभार्थी आहेत. मागील नऊ वर्षात ज्या योजना देशाचे नेतृत्व करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविल्या त्या सर्व जनकल्याण साधणाऱ्या आहेत. अंत्योदयाच्या मार्गाने "सबका साथ सबका विकास" या धर्तीवर काम करीत असलेले सरकार विकसित राष्ट्राचे स्वप्न पूर्ण करणारे आहे. या सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांच्या मनातील अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. याच काळात राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त होवून लवकरच भव्य राममंदिर पूर्ण होणार आहे, काश्मीर मधील 370 कलम हटविले गेले, सर्जिकल स्ट्राइक सारखा धाडसी निर्णय मोदी सरकारने घेतला. आणि नुकतेच झालेले नविन संसद भवनाचे उद्घाटन नवभारताची दिशा स्पष्ट करणारे आहे. देशपातळीवर विविध योजना राबविल्या जात असताना लोकसभा मतदारसंघात अनेक नवे संकल्प पूर्णत्वास गेले. “भंडारा चिन्नोर" असे येथील तांदळाला मिळालेले मानांकन, गोंदिया येथे सुरू झालेले विमानतळ, जलद गतीने पूर्ण होणारे राष्ट्रीय महामार्गाचे जाळे, नियोजित मेट्रो प्रकल्प, घेतलेली पाणी परिषद अशा अनेक गोष्टी मतदार संघाच्या विकासात भर घालणाऱ्या आहेत.