*वर्धा नांदेड रेल्वे मार्गेला गती*
*सारस एक्सप्रेस यवतमाळ* - यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांनी वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाच्या कामाला गती दिली. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग नागपूर-तुळजापूरचे काम पूर्ण करून यवतमाळ जिल्हा विकासाच्या नकाशावर आणला आहे. ही दोन्ही कामे यवतमाळ शहराची कनेक्टिव्हिटी वाढविणारी असल्याने भविष्यात यवतमाळात उद्योगधंदे येतील असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना नऊ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या काळात वर्धा-नांदेड रेल्वेला खर्या अर्थांने गती मिळाली. विद्यमान खासदार भावना गवळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री व रेल्वेमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून वर्धा-नांदेड रेल्वेच्या कामाला गती दिली आहे. तर, नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गामुळे यवतमाळच्या विकासाला गती मिळाली आहे.यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी पाच टर्म प्रतिनिधित्व केले. गेल्या नऊ वर्षांचा विचार केला तर रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग हीच विकासाची प्रमुख कामे झालेली आहेत. खासदार गवळी या शिवसेनेच्या असतानाही त्यांनी अनेक कामे केली आहेत. आता तर त्या भाजपसोबत घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) पक्षात आहेत.
Social Plugin