पिक अप पलटी होऊन 31 महिला गंभीर जखमी*डवकी ते फुक्किमेटा मार्गावरील घटना

*पिक अप पलटी होऊन 31 महिला गंभीर जखमी*
डवकी ते फुक्किमेटा मार्गावरील घटना
    सारस न्यूज़ एक्सप्रेस गोंदिया 
देवरी, दि. ३० :-  देवरी तालुक्यातील बोरगाव (डवकी) येथील महिला मजूर आज सकाळी १०.००  वाजे दरम्यान ग्राम फुक्किमेटा येथे भात रोवणीच्या  कामाला गाडी न.MH 35 J 051 मिनी डोर ( पिक अप) वर बसून जात असताना वाहन चालकाचा गाडीवरून नियंत्रण सुटून गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात पलटी झाला. त्यात गाडीवर बसलेल्या 31 महिला मजूर घायल झाल्या. त्यात कित्येक महिला मजुराची स्थिती गंभीर आहे.
सविस्तर असे की, ग्राम बोरगाव येथील 31 महिला ह्या बोरगाव वरून 10 की.मी. अंतरावर असलेल्या ग्राम फुक्किमेटा येथील शेतकरी संतोष ब्राह्मणकर यांच्या शेतात मिनी ट्रक मध्ये बसून  धानाची रोवणी करायला जात होते.
  पण मिनी ट्रक चालक यांचा गाडीवरील नियंत्रण सुटून,गाडी पूर्णतः रस्त्याच्या खाली उतरून,रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात पलटी झाली.आणि या अपघातात,महिला मजूर वर्ग गंभीर जखमी झाले.त्यात दोन ते तीन महिलांची जास्त गंभीर आहेत. या अपघातामध्ये फुलन घासले,सयोगिता नंदेश्वर,विफुला साखरे, अनिता ठाकरे गंभीर आहेत.31 महीलामधून 20 ते 21 महिलांना गोंदिया येथे रेफर केले असून,बाकी महीलाचा देवरी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.पुढील तपास देवरी पोलीस कर्मचारी करीत आहेत.
*डवकी ते फुक्किमेटा रस्त्याची दुर्दशा*
   डवकी ते फुक्किमेटा  पूर्णतः रस्ता खराब असून या रस्त्यावरील झालेल्या अपघाताला इथले जनप्रतिनिधी तसेच प्रशासन जबाबदार आहेत. असे नागरिकांचे म्हणणं आहे. जर रस्ता चांगला गुडगुडीत असता, तर अपघात झालाच नसता अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे