*७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, क्षेत्र सहायक निलंबित*

*७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, क्षेत्र सहायक निलंबित* 

गडचिरोली : राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा
तालुक्यातील आसरअल्ली वनपरिक्षेत्रात वनविभागाने केलेल्या कारवाईमुळे सागवान तस्करांचे धाबे दणाणले आहे. यात १९ फर्निचर दुकानांवर छापे टाकण्यात आले, त्यापैकी ९ दुकानांमधून तब्बल साडेसात लाखांचे अवैध सागवान पाट्या जप्त करण्यात आल्या. या सागवान तस्करांना मदत करणाऱ्या क्षेत्र सहाय्यक कादीर शेख यांना उपवनसंरक्षक पूनम पाटे यांनी
निलंबित केले आहे.