पाऊस झाल्याने देवरी ,अर्जुनी/मोर.आदी धान उत्पादक तालुक्यात काही शेतकऱ्यांनी धानाचे प-हे टाकणे सुरू केले आहे. मात्र, काही शेतकरी दमदार पावाच्या प्रतिक्षेत आहेत. सोमवारी पावसाने जोर पकडला. दुपारी दमदार सरी बरसल्या. लांबलेल्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवली होती. विहीर, पंप असलेल्या शेतकऱ्यांनी धान रोपे तयार केली होती, तर आवत्या पद्धतीने धान पेरणी केलेले शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. आवत्या पेरणी पद्धतीत शेतात अगोदर नांगरणी वखरणी करून धान शिंपल्या जातो. त्यानंतर पुन्हा उभी आडवी नांगरणी केल्या जाते. आता धान प्रत्यक्ष आवण्यासाठी शेतकऱ्यांना दमदार पावसाची आवश्यकता आहे. पुन्हा उन्ह तापले तर आवत्या पद्धतीने केलेल्या धान पेरण्या संकटात सापडण्याची शक्यता आहे
Social Plugin