गोंदिया जिल्ह्यात २७ जूनला जोरदार पावसाचा इशारा*

*गोंदिया जिल्ह्यात २७ जूनला जोरदार पावसाचा इशारा*
          सारस एक्सप्रेस 
गोंदिया - हवामान खात्याच्या अंदाजानुसार २७ जून २०२३ रोजी गोंदिया जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 
 मौसम विभागाने आज जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार मंगळवार २७ जून रोजी गोंदिया व भंडारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दाखविण्यात आला आहे. या नुसार जिल्ह्यात जोरदार ते अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची सुद्धा शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व तालुका यंत्रणांनी आपापल्या स्तरावरून नागरिकांना सूचना द्याव्यात असे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले.
*नागरिकांना सूचना*
हवामान खात्याने नागरिकांना खालील सूचना केल्या आहेत. संरक्षणात्मक कपडे घाला आणि घरातच आश्रय
घ्या. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्या आणि दरवाजापासून दूर रहा. रोडवे अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साठते ते टाळा - ते अनपेक्षितपणे पूर किंवा ओव्हरफ्लो होऊ शकतात. खराब दृश्यमानतेमुळे मुसळधार पावसात वाहन चालवणे टाळा. शक्य असल्यास, पार्क करा आणि तुमचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी पाऊस कमी होईपर्यंत किंवा थांबेपर्यंत प्रतीक्षा करा. पूर आलेला रस्ता ओलांडून गाडी चालवण्याचा
प्रयत्न करू नका. पाणी दिसते त्यापेक्षा खोल आणि मजबूत असू शकते आणि त्यात मोडतोड, तीक्ष्ण
किंवा धोकादायक वस्तू, भांडे छिद्र किंवा विजेच्या तारा असू शकतात. पॉवर लाईन्स किंवा विजेच्या तारांपासून दूर राहा. फ्लॅश पूर चेतावणी आणि अद्यतनांसाठी सतर्कता आणि हवामान अहवालांचे निरीक्षण करावे असे हवामान खात्याने सांगितले आहे.
0000