गेल्या काही दिवसांपासूण मुलींवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये दर्शना पवार हत्याकांड ताज असतानाच आत्ता पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यामध्ये एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये तरुणी जखमी झाली आहे. ही तरुणी एमपीएसची विद्यार्थिनी असून एकतर्फी प्रेमातून या तरुणीवर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातील सदाशिव पेठेतील ही घटना असून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. दर्शना पवारच्या हत्येनंतर पुन्हा एकदा एका तरुणीवर हल्ला झाल्यामुळे मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहत आहे.
या घटनेमुळे पुण्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणाने हा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यामध्ये तरुणी जखमी झाली असून तिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. पीडित तरुणीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार हा तरुण गेल्या बऱ्याच दिवसांपासून पीडित तरुणीला त्रास देत होता. या विषयीची सर्व कल्पना तरुणाच्या आई-वडिलांना देण्यात आली होती. तरुणालाही समजावून सांगण्यात आले होते
Social Plugin