एक पण विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये : जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले


एक पण विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये : जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले


प्रतिनिधी / गोंदिया : शैक्षणिक सत्र २०२३-२४ सुरु होणार असून शाळा २९ जून पासून सुरु होत आहेत. विद्यार्थ्यांचे स्वागत करायला प्रशासन आणी शिक्षक वर्ग सज्ज झाले आहेत. गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी शाळा सुरु होत असतांना प्रशासन आणि पालकांना सूचना केल्या आहेत. वय वर्ष ७ ते १८ मधील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी  शाळा प्रवेश उत्सव २८ जून ते ३०जून च्या दरम्यान राबवण्यात येत असून शिक्षक आणि पालक वर्गाने शाळांची विद्युत व्यवस्था तसेच इतर व्यवस्था तपासून घ्यावी काही त्रुटी आढळून आल्यास त्या सुधारून घ्याव्यात तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करावे व सोबतच गावात प्रभातफेरी काढण्यात यावी. पालकांनी विद्यार्थ्यांना पुस्तक आणि गणवेश मिळाल्याची खातरजमा करावी आणि एक पण विद्यार्थी गोंदिया जिल्ह्यात शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी अशी आवाहन केले आहे