तलाठी भरती कोणत्या जिल्ह्यात किती जागा*

*तलाठी भरती
 कोणत्या जिल्ह्यात किती जागा* 
 
तलाठी भरती : 2023 :  कोविड नंतर मोठी सरकारी नोकरीची मोठी संधी आहे. महाराष्ट्र राज्यात 4,644  तलाठी भरती (Talathi recruitment)पदावर होत येणार असून आजपासून भरती प्रक्रिया सुरू होत आहे. सरकारी नोकऱ्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात तब्बल 4 हजर ,644 तलाठी नोकऱ्या भरल्या जाणार आहेत. नोकरीची जाहिरात सरकारी वेबसाइटवर टाकण्यात आली आहे. आजपासून ऑनलाइन भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ जुलै आहे. https://mahabhumi.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज भरता येईल.

कशी असेल परीक्षा
तलाठी  नोकरी भरती करीता  ऑनलाइन परीक्षा पद्धतीचा अवलंब केला जाईल. या परीक्षेत तुम्ही  कोणत्याही एका जिल्ह्यात अर्ज करू शकतो. परीक्षेतील मराठी, इंग्रजी, सामान्य अध्ययन, बौद्धिक (गणित) प्रश्नपत्रिकेला 200 गुण मिळाले आहेत. पदवी आणि माध्यमिक परीक्षांमध्ये  उमेदवारांनी हिंदी आणि मराठी विषयांचे विदयार्थी ही परीक्षा देऊ शकतात.  ऑनलाइन परीक्षा खाजगी संस्था TCS मार्फत प्रशासित केल्या जातील, असून परीक्षेबाबत सविस्तर माहिती वेबसाईटवर मिळेल.

तलाठी भरती : काय आहे पात्रता
पद नाव : तलाठी

एकूण जागा : ४६४४ जागा

शिक्षण अहर्ता : पदवीधर

वय किती असावे  : 18  ते 38  वर्षे (राखीव उमेदवारांसाठी 43वर्षे)

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग 1000/- राखीव प्रवर्ग : 900/-

अर्जाची अंतिम मुदत : 17 जुलै 2023

तलाठी भरती: कोणत्या जिल्ह्यात  किती जागा?
तलाठी भरती साठी कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत हे सुद्धा या बातमीत आपण जाणून घेणार आहोत. जिल्हा निहाय जागा अश्या आहेत … अहमदनगर – 250, अकोला – 41, अमरावती – 53, संभाजीनगर – 161, बीड – 187, भंडारा – 67, बुलढाणा – 49, चंद्रपूर – 167, धुळे – 205, गडचिरोली – 158, गोंदिया – 60, हिंगोली -76, जालना – 118, जळगाव – 208, कोल्हापूर – 56, वर्धा – 78, लातूर – 63, वाशिम – 19, नागपूर – 177, नांदेड – 199, नंदुरबार – 54, नाशिक – 268, धाराशिव – 110, परभणी – 105, पुणे – 383, रायगड – 241, रत्नागिरी – 185, सांगली – ९८, सातारा – 153, सिंधुदुर्ग -143, सोलापूर – 197, ठाणे – 65, मुंबई उपनगर – 43, यवतमाळ- 123, मुंबई शहर – 19, पालघर – 142

महाराष्ट्र सरकारच्या वतीने जिल्हानिहाय वरील तलाठी पदाच्या जागा भरल्या जाणार असून त्यासाठी आजपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत