रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई
प्रवाशी गाडीमध्ये अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या इसमास अटक
सारस एक्सप्रेस नागपूर
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे रेल्वे स्टेशन नागपुर येथे २६ जून रोजी गुन्हेगार वॉच डयुटी करीत असतांना प्लॅटफार्म न. 02 वर सकाळी 10:00 वा सुमारास ट्रेन क्र. 16032 अंदमान एक्सप्रेस आली असता नमुद स्थानिक गुन्हे शाखेचे स्टाफ व सी. आय.बी. (आर.पी.एफ) सह नमुद ट्रेन चेक करीत असतांना कोच क एस / 4 चे बर्थ क्र.55 व 56 चे खाली असलेल्या दोन कापडी पिशवी चेक केली असता त्यात विदेशी कंपनीची दारू असल्याचे दिसुन आले. सदरच्या दोन्ही बॅगा हया बर्थ क 56 वरील प्रवासी नामे अकला राधा कृष्णा रेड्डी S/O राम बाबु वय 24 वर्षे राह 5-189, कारलापालेम गुंटूर राज्य आंध्रप्रदेश याची असल्याचे समजले त्यास विचारपुस केली असता तो न्यु दिल्ली ते बापटला असा प्रवास करीत असुन तो विना पास परवाना नमुद दारू बापटला आंध्रप्रदेश येथे घेवुन जात होता. नमुद झडती घेतलेल्या बॅगांची जप्ती पंचनामा कार्यवाही केली असता 1) एक पिवळया रंगाची कापडी पिशवी चैन असलेली त्यावर "महावीर प्रिमीयम चाय असे लिहीलेले किंमत 100 /- रू. त्यात OLD MONK XXX RUM कंपनीची (त्यावर For Sale to Defence Personal Only) असे लिहीलेले 750 ML च्या 30 नग प्लास्टीक बॉटल्स किंमत प्रत्येकी 520/- रू. असा किमंत 15600 /- रू. चा माल, 2) एक पिवळया रंगाची कापडी पिशवी चैन असलेली त्यावर "महक सिल्वर पान मसाला" असे लिहीलेले कि. 100 /- रू. त्यात OLD MONK XXX RUM कंपनीची (त्यावर For Sale to Defence Personal Only) असे लिहीलेले 750 ML च्या 30 प्लास्टीक बॉटल्स किंमत प्रत्येकी 520/- रू. असा किमंत 15600 /- रू. चा माल असा एकुण मिळालेला विदेशी दारूची एकुण किंमत 31400/- रू चा माल, त्यांचेकडुन जप्त करण्यात आला. याबाबत रेल्वे पोलीस स्टेशन नागपुर येथे अपराध क्रमांक 671 / 2023 कलम 65 अ (ई). 66 (ब) महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही डॉ. अक्षय शिंदे, पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपुर श्री हेंमत शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी, लोहमार्ग नागपुर यांचे मार्गदर्शनात श्री विकास कानपिल्लेवार, स्था. गु. शाखा यांचे सुचनेनुसार गुन्हे शाखेचे पो. उपनिरीक्षक प्रविण भिमटे, पो.हवा. महेंद्र मानकर, पो.हवा. श्रीकांत धोटे, पो.ना. विनोद खोब्रागडे, पो.ना. अविन गजवे, पो.शि. चंद्रशेखर मदनकर, पो.शि. राहुल यावले, पो.शि. गिरीश राउत, पो.शि. पंकज बांते, पो.शि. मंगेश तितरमारे यांनी केली.
Social Plugin