*आणिबाणीच्या निषेधार्थ भाजपाने पाळला काळा दिवस*
सारस एक्सप्रेस गोदिया
भारतीय जनता पार्टी गोंदिया शहर व ग्रामीण मंडळतर्फे आज, 25 जून रोजी भाजप कार्यालयात आणिबाणीच्या निषेधार्थ काळा दिवस पाळण्यात आला.
प्रसंगी व्हीडिओ फितीच्या माध्यमातून आणिबाणी काळात घडलेल्या विविध प्रसंग, घटनांची माहिती दाखविण्यात आली. आणिबाणीत कशा प्रकारे लोकशाहीची हत्या करुन हुकूमशाही लादण्यात आली, याबाबतच्या जिल्ह्यातील मिसाबंदीचे अनुभव सांगण्यात आले. दरम्यान, कार्यालयासमोर बॅनरद्वारे आणिबाणी काळाचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आमदार तथा गोंदिया विधानसभा प्रभारी हेमंत पटले, माजी जिप अध्यक्ष तथा लोकसभा प्रभारी विजय शिवणकर, जिल्हा महामंत्री संजय कुळकर्णी, जिप सभापती संजय टेंभरे, शहर अध्यक्ष सुनील केलनका, ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनलाल ठाकरे, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष गजेंद्र फुंडे, माजी सभापती राजकुमार कुथे, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष नारायण चांदवानी, ॠषीकांत साहू, मिलिंद शेवाळे, शंभुशरणसिंह ठाकूर, जिप सदस्य रितेश मलगाम, विजय उईके, योगराज रहांगडाले, शालिनी डोंगरे, दिलीप गोपलानी, गोल्डी गावंडे, बबली ठाकूर, प्रदिप मेश्राम, मनीष पोपट, शुभा भारद्वाज, धर्मिष्ठा सेंगर, गुड्डू चांदवानी, नितीश शहा, मनोज पटनायक, अंकीत जैन, अशोक जयसिंघानी, अर्जुन नागपुरे, मिलिंद बागडे, सतीश मेश्राम, योगेश सोलंकी, सुशिल राऊत, पुरु ठाकरे, राकेश अग्रवाल, पंकज भिवगडे, रमेश बिसेन, पंकज मिश्रा, अमरसिंग राजपूत, अजीत नायर, सुभाष निनावे, टेकचंद रहिले, संजय लिल्हारे, राजेश चौरसिया, रतन वासनिक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जयंत शुक्ला यांनी केले.
Social Plugin