नागपूर रेल्वे पोलिसांची कार्यवाही* *चोरीच्या आरोपात दोन सख्ख्या भावांना अटक*

*नागपूर रेल्वे पोलिसांची कार्यवाही*

 *चोरीच्या आरोपात दोन सख्ख्या भावांना अटक* 
    सारस न्यूज एक्सप्रेस नागपूर
नागपूर लोहमार्ग रेल्वे पोलीसच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोटरसायकल  चोरीच्या आरोपाखाली दोन सख्ख्या भावांना अटक करून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कार्यवाही 20 जून रोजी करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा रेल्वे लोहमार्ग  नागपूर यांनी दिली आहे अटक झालेल्या आरोपींची नाव वर्धा निवासी यश अमन पुणेकर 23 व ऋषी अमन पुणेकर 19 असे आहे
सविस्तर माहिती अशी की
दि. १९/०६/२०२३ रोजी फिर्यादी नामे अभिषेक मंगल श्रीरामे राह भांडे प्लॉट, नागपुर हे त्यांची सालेन्डर प्लस कंपनीची ब्लॅक ग्रे रंगाची हि मोटर सायकल MH 49 AN 5484 कि. ७०,०००/- रू हि रेल्वे स्टेशन नागपुर येथील प्लॅटफार्म न ८ चे पुलाखाली ठेवुन डयुटीवर गेले व दि. २०/०६/२०२३ रोजी सकाळी ड्युटी संपल्यावर गाडी ठेवलेल्या ठिकाणी येवुन गाडी पाहिली असता त्यांची नमुद मोटरसायकल दिसुन आली नाही. अधिक शोधाशोध करता गाडी मिळुण न आल्याने ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने लक्षात येताच त्यांनी लेखी तकार दिलेवरून रेल्वे पोलीस स्टेशन नागपुर येथे अप के ६७५/२०२३ कलम ३७९ भादवि चा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानुसार रेल्वे स्टेशन नागपुर चे परीसरात लावण्यात आलेले सिसिटीव्ही फुटेज तपासले असता दोन व्यक्ती नमुद मोटर सायकल चोरून नेत असताना दिसुन आले. दिनांक २८/०६/२३ रोजी गुप्तबातमीदाराव्दारे माहिती मिळाली कि नमुद गाडी चोरणारे इसम हे वर्धा येथील तारफैल परीसरात राहत आहेत त्यावरून मोटर सायकल चोरनारे संशयीत इसमांच्या राहत्या पत्यावर जावुन त्यांना सापळा रचुन मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले. ते दोघे सख्खे भाऊ असुन त्यांची नावे १) यश अमन पुणेकर वय २३ वर्षे, ०२) रिषी अमन पुणेकर वय १९ वर्ष दोन्ही राह, तारफैल मॉडल शाळेजवळ वर्षा अशी आहेत व त्यांना सदर गुन्हयातील मोटरसायकलचे वर्णन सांगुन मोटर सायकल विषयी विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हयातील मोटरसायकल चोरी केल्याचे कबुल केलें सदर मोटर सायकल हि त्यांच्या घरांच्या अंगणात दिसल्याने त्याची पाहणी केली असता त्यावरील चेसीस नं. MBLHA 10CGHHB75399 व इंजीन नं. HA10ERHHB80302 हे गुन्हयातील चोरी गेलेल्या गाडीचे असल्याने व रेल्वे स्टेशन नागपुर परीसरात सिसिटीव्ही फुटेज मधील दिसणारे दोन्ही संशयीत इसम हे तेच आहेत हे निष्पण झाले त्यावरून नमुद गुन्हयातील मोटर सायकल हि दोन पंचा समक्ष जप्ती पंचनाम्या प्रमाणे जप्त करण्यात आले आहे. तसेच नमुद मोटर सायकल चोरणारा आरोपी यश अमन पुणेकर वय २३ वर्षे हा मोटर सायकल व ऑटो चोरीचा वर्धा जिल्हयातील सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर पो.स्टे. वर्धा येथे गुन्हे

दाखल आहेत. नमुद दोन्ही आरोपी व मुददेमाल पुढील कार्यवाही कामी रेल्वे पोलीस स्टेशन नागपुर यांचे ताब्यात देण्यात आले आहे..

सदरची कार्यवाही डॉ. अक्षय शिंदे, पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपुर, श्रीमती वैशाली शिंदे अपर पोलीस अधीक्षक, लोहमार्ग नागपुर व श्री हेंमत शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी, लोहमार्ग नागपुर यांचे मार्गदर्शनात श्री विकास कानपिल्लेवार, स्था गु. शाखा यांचे सुचनेनुसार गुन्हे शाखेचे पो. उपनिरीक्षक प्रविण भिमटे, पो.हवा, महेंद्र मानकर, पो.ना. विनोद खोब्रागडे, पो.ना. नितीन शेंडे, पो.ना. अविन गजवे, पो.शि. गिरीश राउत, पो.शि. मंगेश तितरमारे यानी केली.