इराक च्या तरुणांकडे नागपूर विद्यापीठाची डिग्री*

*इराक च्या तरुणांकडे नागपूर विद्यापीठाची डिग्री*  

 : इराक मधील  27 तरुणांनी नागपूर विद्यापीठाच्या पदवीवर नोकरी मिळवली. मात्र, एका झटक्यात हे सर्व तरुण बेरोजगार  झाले आहेत. इराक दूतावासाकडून या पदव्यांची पडताळणी करण्यात आली. यावेळी या सर्वांच्या पदव्या बोगस असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. इराक मधील या तरुणांनी नागपुर विद्यापिठाच्या या बोगस पदव्या कशा मिळवल्या याचा तपास सध्या सुरु आहे. आतंरराष्ट्रीय स्तरावरील बोगस डिग्रीचे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. बोगस पदव्या उपलब्ध करुन देणारे मोठे रॅकेट कार्यरत असू शकते अशी देखील शंका उपस्थित केली जात आहे.