गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या*

*गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या*
सारस न्यूज एक्सप्रेस गोंदिया 
*देवरी* देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत गोटाबोडी अंतर्गत ग्राम आवरीटोला येथील शेतकरी श्रीकृष्ण जगन भोयर वय 36 वर्ष याने आज दि.25 रोज मंगळवार ला सकाळी आठ वाजे दरम्यान शेतीच्या कामावर असताना, शेताला लागून असलेल्या अंजनाच्या झाडाला नायलॉन दोराच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
    सूत्रानुसार, सदर व्यक्ती शेतकरी असून,  भात पिकाच्या लावणी च्या कामावर शेतावर गेला असता,आज सकाळी 8 वाजे दरम्यान तो मजुरासोबत शेतीची कामे करीत होता. पाण्याचे इंजन बंद करून येतो म्हणून त्याने मजुरांना सांगितले.अर्धा तास होऊन सुद्धा तो परत न आल्याने  मजुरांनी व त्याच्या चुलत भावाने त्याचा शोध घेणे सुरू केले. असता तो शेतशिवाराजवडील  नाल्याजवळ आंजनाच्या झाडाला नॉयलन दोराच्या सहाय्याने फासावर लागून असल्याचे दिसले. त्यांनी त्याला खाली उतरवून  उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय देवरी येथे आणले असता, डॉक्टरांनी सदर व्यक्तीला मृत घोषित केले. शेतकऱ्याच्या मृत्यू पश्चात त्याला दोन मुले आणि पत्नी असून आवरीटोला गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.  श्रीकृष्ण  भोयर याने गळफास लावून आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही. देवरी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास देवरी पोलीस स्टेशन येथील पो.ह. ग्यानीराम करंजेकर हे करीत आहेत.