*नदीपात्रात बुडून दोन बालकांचा मृत्यू; मुंडीपार (खुर्द )येथील घटना*
सारस न्यूज़ एक्सप्रेस
गोंदिया तालुक्यातील मुंडीपार (खुर्द) येथील पांगोली नदी पात्रात बुडून दोन बालकांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.29) दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली आहे.गंगाधर भिवाजी भरणे वय 14 वर्षे व आर्यन शालिकराम सहारे वय 12 वर्ष असे दुदैवी बालकांची नावे आहेत.आकस्मिक घडलेल्या घटनेमुळे गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे.
सदर दोन्ही मुले सकाळी गावाजवळून वाहणाऱ्या पांगोली नदी शेतशिवारात बकऱ्या चरणाकरिता गेले होते. अशात नदीपात्रा जवळुन जात असतानी त्यातील आर्यन या मुलाचा चिखलातून पाय घासरल्या मुळे तो नदीपात्रातील पाण्यात पडला.त्याला वाचविण्यासाठी गंगाधर ने ही प्रयत्न केले मात्र पाणी खोलवर असल्यामुळें दोन्ही विद्यार्थ्यांचा त्यात बुडून मृत्यू झाला.गंगाधर वर्ग नववीचा तर आर्यन हा वर्ग आठ चा विद्यार्थी होता. दोन्ही विद्यार्थ्यांच्या आकस्मिक मृत्यू च्या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करीत शोककळा पसरली आहे. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे करीत आहेत
Social Plugin