स्वर्गीय ब्रिजलालजी कटरे हायस्कूल शहावाणी येथे केंद्रस्तरीय शिक्षन परिषद व वृक्षारोपण
सारस न्यूज एक्सप्रेस गोंदिया
गोरेगांव-केंद्रस्तरीय पहिली शिक्षण परिषद व विद्या समीक्षा केंद्र कार्यशाळा कवलेवाडा,प.स. गोरेगांव केंद्रांतर्गत स्वर्गीय ब्रिजलालजी कटरे हायस्कूल शहारवानी येथे दिनांक 25 जुलै ला शाळेचे मुख्याध्यापक आर.वाय.कटरे यांच्या अध्यक्षतेखाली व तसेच केंद्र अंतर्गत सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील वर्ग 1ते 8 ला शिकविणारे सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या उपस्थतीत घेण्यात आली.
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व शारदा माता यांच्या पुजनाने झाली.मुख्याध्यापक आर वाय कटरे यांनी शिक्षण परिषद महत्त्व व आवश्यकता यावर आपले सर्वप्रथम मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे मुख्याध्यापक भगत मुख्याध्यापक पारधी यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले तदनंतर शिक्षण परिषद सुलभक यांच्याद्वारे विविध विषयावर परिषद पार पाडण्यात आली.यामध्ये व्ही.एस.के.विद्या समीक्षा केंद्र प्रस्ताविक व उद्देस यावर सुलभक केंद्रप्रमुख वैष्णव तसेच तंत्रस्नेही शिक्षक महेश बोरकर यांनी मार्गदर्शन केले,शाळापूर्व तयारी व विद्या प्रवेस वर देवेंद्र धापाडे, सेतू अभ्यास वर सुरेश भावे ,शाळा बाह्य ,मुले,सेतू अभ्यास यावर साधन व्यक्ती सुनील ठाकूर , वार्षिक नियोजन व अध्ययन स्तर निश्चिती यावर साधन व्यक्ती बहेकार, मुलींची मासिक पाळी वर मार्गदर्शन अनिता माकडे यांनी केले.वरील सर्व विषयावर सर्वांनी योग्य मार्गदर्शन केले.सदर परिषदेत शाळेच्या शालेय परिसरात सर्वांच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट टी.बी.कटरे व सचिव यू .टी .बीसेन यांच्या संकल्पनेतून एक झाड एक विद्यार्थी या उपक्रमांतर्गत विविध जातीच्या रक्तचंदन, बकुल,आंबा ,कटार ,नींबू ,जाम ,आवला ,जामुन ,बदाम ,चिकू, अनार यासारख्या जवळपास 200 वृक्षांचे वृक्षा रोपण कार्यक्रम घेण्यात आले, सदर कार्यक्रमाकरिता शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी मोलाचे योगदान देऊन अथक परिश्रम घेतले.वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची ची सांगता करण्यात आली
Social Plugin