सारस न्यूज़ एक्सप्रेस गोंदिया
अर्जुनी मोरगांव तालुक्यात आज ता.26 दुपारी 2:30 ते 3 वाजेच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आला.या दरम्यान तालुक्यातील बोळदे/करड येथील शेतकरी शेतात काम करीत असताना अचानक विज कोसळून रोहिदास लहानु हुमणे वय 53 वर्ष हा जागीच ठार झाला. मृतक रोहिदास हुमणे हे अल्पभुधारक शेतकरी असुन त्यांच्याकडे एक ते सव्वा एकड शेती आहे.त्यांचे पश्च्यात पत्नी व एक मुलगा आहे. अर्जुनी मोर. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
मृतकाच्या कुटृंबियांना त्वरीत शासकीय मदत देण्यात यावी असी मागणी सरपंच बन्सिधर लंजे यांनी केली आहे.
Social Plugin