विकास कामांना गती देण्यासाठी आ. विनोद अग्रवाल एक्टीव**जिल्हाधिकार्‍याच्या नेतृत्वात घेतला आढावा*

*विकास कामांना गती देण्यासाठी आ. विनोद अग्रवाल एक्टीव*

*जिल्हाधिकार्‍याच्या नेतृत्वात घेतला आढावा*
        सारस न्यूज़ एक्सप्रेस 
गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्राला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमदार विनोद अग्रवाल सतत प्रयत्नरत आहेत. भौतिक विकासासह विधानसभा क्षेत्रात शैक्षणिक, आरोग्य विषयक, पुनर्वसन व व्ययक्तिक विकासाच्या योजनांना पुढे नेण्यासाठी आमदार विनोद अग्रवाल हे एक्टीवर मोडवर आले आहेत. दरम्यान आज २४ जुलै रोजी जिल्हाधिकारी गोतमारे यांच्या नेतृत्वात आढावा घेवून विकासात येणार्‍या अडअडचणी त्वरित मार्गी लावण्यात यावे, असे सुचना त्यांनी यंत्रणेला केल्या.

गोंदिया शहराच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध करून देणे, आयुष रुग्णालय, बाई गंगाबाई रुग्णालय, एमसीएचसाठी जागा आरक्षित करणे, केंद्रीय विद्यालयासाठी जागा उपलब्ध करणे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह व सामाजिक न्याय विभागांतर्गत मुलींच्या वसतीगृहासाठी जागा निश्चित करणे, जिल्हा ग्रंथालय व पत्रकार भवन, माहिती कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून प्रसस्त इमारत बांधणे, परसवाडा गावांतर्गत येणार्‍या बटालीनय कॅम्प परिसरात रस्ते व अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लावणे, यासह अनेक मुद्यांना घेवून आमदार विनोद अग्रवाल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांची आढावा बैठक घेतली.

दरम्यान उपरोक्त सर्व संस्था व वसतीगृहासाठी जागा निश्चित करून तसे प्रस्ताव शासनाकडून त्वरित पाठविण्यात यावे, जिल्हास्तरावर कसलीही अडचण येऊ नये या बाबतची सुचना त्यांनी केली. त्याच प्रमाणे झिरुटोला येथील काही शासकीय जागा कोरणीघाट बुद्धिस्ट समिती (ट्रस्ट) ला कशी उपलब्ध करून देण्यात येईल, या बाबतचा आढावाही त्यांनी घेतला. या शिवाय सामूहिक वनहक्क अंतर्गत बनाथर येथील प्रलंबित असलेले दावे  त्वरित निकाली लावण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, रजेगाव-काटी उपसा सिंचनाच्या कालव्यासाठी अधिगृहित केलेल्या जमिनीचा मोबदला शेतकर्‍यांना त्वरित देण्याच्या संदर्भात निर्माण असलेली अडचण जाणून त्या शेतकर्‍यांना मोबदला त्वरित देण्या संदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात यावे. या शिवाय पुजारीटोला, कासा या गावाचे पुनर्वसन करण्याच्या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या संदर्भातही चर्चा करण्यात आली. एकंदरीत आमदार विनोद अग्रवाल यांनी आज विधानसभा क्षेत्राच्या सर्वागिन विकासाला गती देण्याच्या अनुषंगाने आढावा घेतला. या बैठकीत जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, पं.स.सभापती मुनेश रहांगडाले यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.