अर्जुनी मोर. :- तालुक्यातील ईटखेडा येथील तेरा महीण्याच्या चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यु झाल्याची घटना आज दि 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:45 वाजेच्या दरम्यान घडली.मृतक चिमुकलीचे नाव अमाया आकाश वैद्य आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ईटखेडा येथील सहा महिण्याची चिमुकली 23 ऑगस्ट रोजी आपल्या घरी खेळत होती.दरम्यान सायंकाळी पावने सहा वाजेच्या दरम्यान घराच्या भिंतीतील छिद्रात असलेल्या विषारी सापाने त्या चिमुकलीला दंश केला. हि बाब घरच्या मंडळींच्या लक्षात येताच ताबडतोब ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर. येथे हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच सदर चिमुकली मृत्यु पावली.या तेरा महीण्याच्या चिमुकलीच्या मृत्युने कुटुंबियांना जबर धक्का बसला. तसेच संपुर्ण ईटखेडा गाव हळहळला.
Social Plugin