राष्ट्रवादीला मोठा धक्का! एकनाथ खडसेंसोबत गेलेल्या पाच जणांची भाजपमध्ये घरवापसी

राष्ट्रवादीला मोठा धक्का! एकनाथ खडसेंसोबत गेलेल्या पाच जणांची भाजपमध्ये घरवापसी
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये पक्षांतराला वेग आला आहे. अशातच भाजपने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.भुसावळमध्ये राष्ट्रवादीला हा मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या पाच माजी नगरसेवक, पदाधिकारी पुन्हा स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये परतले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.