३९ गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या नक्षलवादी दाम्पत्याला अटक

३९ गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या नक्षलवादी दाम्पत्याला अटक
 
गडचिरोली : तब्बल ३९ गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या नक्षलवादी दाम्पत्याला अटक करण्यात तेलंगणा पोलिसांना यश आले आहे. कुसनन अशोक रेड्डी उर्फ बलदेव आणि कुमारी कोटाई उर्फ रहमती, असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावे असून मध्यप्रदेशातील जबलपूर येथून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दोघांवरही २० लाखांचे बक्षीस होते. यापूर्वी २००५ मध्ये गडचिरोली येथील पुराडा परिसरात केलेल्या हिंसक गुन्ह्यात देखील कुसनन अशोक रेड्डी याला अटक झाली होती.