लाचखोर प्रभारी दुय्यम निबंधक अडकला एसीबीच्या जाळ्यात

लाचखोर प्रभारी दुय्यम निबंधक अडकला एसीबीच्या जाळ्यात 
    सारस न्यूज एक्सप्रेस गोंदिया 
शेत जमीन ची रजिस्टरी करुन देण्याचा नावावर शेतकऱ्यांकडून 8 हजार रुपयांची मागणी करणाऱ्या सालेकसा प्रभारी दुय्यम निबंधक काला एसीबीने आपल्या जाळ्यात अडकविले. ही कऱ्यवाई 28 आगष्ट रोजी केली असून प्रकरणाची माहिती आज गुरूवार 31 आगष्ट रोजी देण्यात आली. आरोपीचे नाव मधुकर लोकनाथ मेश्राम रा. गोंदिया असे सांगण्यात आले. 

   या संदर्भात माहिती देण्यात आली की,मधुकर लोकनाथ मेश्राम वय 50 वर्ष रा. गोंदिया धंदा नोकरी  , पद-  प्रभारी दुय्यम निबंधक , सालेकसा श्रेणी 1 (मुळपद व नेमणूक कनिष्ठ लिपीक वर्ग ३,दुय्यम निबंधक कार्यालय आमगाव असे असून                                   तक्रारदार हे शेतकरी आहेत .त्यांनी खरेदी केलेली मौजा धानोली येथील 16 आर शेत जमिनीची क प्रत जूनी आहे तसेच जमिनीची रजिस्ट्री होणार नाही असे सांगून  सदर शेत जमीनीची रजिस्ट्री करुण देण्याकरिता रु 8000/- रु ची मागणी केली. लाच मागणी पड़ताळनी दरम्यान आलोसे यांनी तक्रारदार यांच्या जमिनीची रजिस्ट्री करुन दिल्यानंतर त्या मोबदल्यात रु 8000/- रकमेची पंचासमक्ष मागणी करून लाच रक्कम प्राप्त करण्याचा प्रयत्न केला आहे.आरोपी लोकसेवक यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून स्वता:च्या लाभाकरीता गैर वाजवी फायदा मिळविण्याचा प्रयत्न केला. 
 आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून त्याचे विरुद्ध पोलीस स्टेशन - सालेकसा जिल्हा गोंदिया येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कार्यवाही एसीबीचे पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर पोलीस अधीक्षक,नागपूर परिक्षेत्र, नागपूर, अपर पोलीस अधीक्षक 
सचीन कदम संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक * 
नागपूर परिक्षेत्र, नागपूर 
  अनामिका मिर्झापूरे, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र,नागपुर.पर्यवेक्षक अधिकारी
विलास काळे
पोलीस उप अधीक्षक
 ला. प्र. वि. गोंदिया यांच्या मार्गदर्शनात 
पो. नि. अतुल तवाड़े 
विलास काळे पो. उप. अधि.,स.फौ. विजय खोब्रागडे, चंद्रकांत करपे 
पो. हवा. संजयकुमार बोहरे,मंगेश काहालकर, नापोशि. संतोष शेंडे, नापोशि संतोष बोपचे, अशोक कापसे,नापोशि प्रशांत सोनवाने, कैलाश काटकर, मनापोशी संगीता पटले ,रोहिणी डांगे, चालक नापोशि  दिपक बाटबर्वे यांनी केली.
       नागरिकांना आव्हान
 *गोंदिया जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील नंबरशी  संपर्क साधावा.
 *1) मा.श्री.राहुल माकणीकर सर, पोलिस अधीक्षक ला.प्र.वि.नागपूर परिक्षेत्र, नागपूर.मो.नं.9923252100.       2) विलास काळे
पोलीस उप अधीक्षक,
ला. प्र.वि .गोंदिया * 
 *मो. नं.9867112185
*अतुल तवाडे पोलीस निरीक्षक ला. प्र. वि. गोंदिया*
मो. क्र.9370997485
 पो. नि. उमाकांत उगले
9664959090
* ला. प्र. वि. गोंदिया 
  दुरध्वनी   07182251203 *
*@ टोल फ्रि क्रं. 1064*** वर संपर्क करावे