सारस न्यूज़ एक्सप्रेस
गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून एकाने आपल्या भावाच्या सुनेची धारदार कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली. ही घटना उघड झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
*काय आहे प्रकरण?*
गोंदिया तालुक्यातील दवणीवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देवरी या गावात प्रीतम ठाकरे यांनी आपल्या भावाच्या सुनेला धारदार कुऱ्हाडीने मारून हत्या केल्याची घटना घडली आहे. देवरी या गावात ठाकरे परिवार हे गेल्या अनेक वर्षापासून राहत असून प्रीतम ठाकरे यांचे त्याच्या भावाच्या मुलांसोबत आणि सुनेसोबत छोट्या मोठ्या कारणांवरून नेहमी वादविवाद व्हायचे. या वादविवादाचा राग मनात ठेवून प्रीतम ठाकरे यांनी त्याच्या भावाची सून शेतात येत असताना तिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. आपल्या कुऱ्हाडीने दहा ते पंधरा वार करून हत्या केली. आणि त्याच कुऱ्हाडीने आपल्या वहिनीवर वार करीत असताना तिचा कान कापल्या गेला असल्याची खळबळजनक घटना देवरी येथे घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी याला दवणीवाडा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास दवणीवाडा पोलीस स्टेशन करीत आहे. उपचाराकरीता वहिनीला जिल्हा रुग्णालय केटीएस येथे दाखल करण्यात आलं आहे.
Social Plugin