उंदराने केला घात, देवा जवळ दिवा लावला आणि फ्रीजचा झाला स्पोट

उंदराने दिव्याची वात नेल्याने फ्रीज ला लागली आग
      सारस न्यूज एक्सप्रेस 
गोंदिया शहरातील सुर्याटोला परिसरातील शिवाजी पुतळ्या जवळ राहणाऱ्या संजू गाते यांच्या घरी देवा जवळ दिवा लावण्यात आले, मात्र उंदराने देवा जवळील दिव्यातील वात  घेऊन फ्रीज जवळ नेल्याने फ्रीज ला आग लागली. या आगीत फ्रीज चा मोठा स्पोट झाला व मोठया प्रमाणत आग लागली .फ्रिज ज्या खोली मध्ये ठेवले होते, त्या खोली मधिल धान्य व इतर साहित्य देखील आगित जळून खाक झाले. स्पोट एवढा मोठा होता की खोली च्या वरची सिमेंट छत मोठ्या प्रमाणत छती ग्रस्त झाली. या आगीत  मोठे नुकसान झाले आहे. 
सविस्तर असे की संजू गाते व त्यांचा कुटुंब रात्री सर्व जण  जेवण करत असताना अचानक फ्रीजला आग लागली व मोठा स्पोट झाला, आग लागल्याने सर्वजण घरा बाहेर निघाले व आग लागलेल्या खोलीत पाणी टाकून आग विझविण्यास सुरवात केली, परिसरातील लोकांनी सुध्दा आग विझविण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती देऊन अग्निशमन दलाला बोलाविण्यात आले व वेळेवर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र आगीत गाते कुटुंबीयांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घराची छत देखील छत्तीग्रस्थ झाली असुन मोठे नुकसान झाले आहे.