अर्जुनी मोर तालुक्यात भाजपाला मोठा धक्का
सारस न्यूज एक्सप्रेस गोंदिया
अर्जुनी मोरगाव तालुक्याचे भाजपाचे कट्टर कार्यकर्ता माजी पं. स. सभापती, माजी जि. प. सदस्य, भारतीय जनता पार्टी चे माजी तालुका अध्यक्ष, अरविंद शिवणकर , डॉ. लोणारे, विनय खोटेले यांचा त्यांच्या सहकाऱ्यांनी आज 22 सप्टेंबर शुक्रवारकाँग्रेसच्या विचार धारेला प्रभावित होऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी दिलीप बन्सोड अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमेटी गोंदिया, घनश्यामभाऊ धामट अध्यक्ष, तालुका काँग्रेस कमेटी अर्जुनी/मोर, प्रमोदभाऊ पाऊलझगडे कार्याध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी अर्जुनी/मोर, चंद्रशेखरजी ठवरे माजी अध्यक्ष जि.प. गोंदिया, मा. सर्वेशभाऊ भुतडा नगरसेवक अर्जुनी/मोर, श्रीकांतभाऊ घाटबांधे सदस्य, जि. प. गोंदिया, विजयजी राठोड, रवींद्रभाऊ खोटेले, मोरेश्वरभाऊ सोनवाने, फुलचंदभाऊ बागडेरिया सदस्य, पं. स. अर्जुनी/मोर, संजयभाऊ नाकडे, प्रितमभाऊ रामटेके, तुलाराम खोटेले, व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे अर्जुनी मोर तालुक्यातील राजकारणात अरविंद शिवणकर हे उत्कृष्ट राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहेत
Social Plugin