स्वच्छतेसाठी धावले शेकडो व्यक्ती* *गोंदिया येथे स्वच्छता रन*

*जिल्हा परिषद अध्यक्ष श्री पंकज रंहांगडाले यांनी दाखविली हिरवी झेंडी*
          सारस न्यूज़ एक्सप्रेस 
गोंदिया, ता. 24 : स्वच्छ, आरोग्यपूर्ण आणि नवीन भारताच्या निर्मितीसह कचरामुक्त भारत करण्याचा संकल्प घेत शहरातील शेकडो नागरिक, विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वच्छता रन मध्ये सहभाग घेतला.  गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. पंकज रहांगडाले,  समाज कल्याण समितीच्या सभापती श्रीमती पूजा सेठ, पंचायत समिती गोंदियाचे सभापती श्री. मुनेश रहांगडाले यांनी 'स्वच्छता रन'ला हिरवी झेंडी दाखवून उपक्रमाच्या शुभारंभ केला. पंचायत विभाग तथा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. आर. खामकर, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी श्री. कादर शेख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे,  गटशिक्षणाधिकारी जे. एस. राऊत, सहायक गटविकास अधिकारी डी. आर. लंजे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री वैद्य, महावीर मारवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री अजय शामका यावेळी उपस्थित होते.

प्रशासकीय भवन समोरून ' स्वच्छता रन' या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महावीर मारवाडी शाळेच्या शिक्षकांनी स्वच्छतेवरील नाटिका सादर केली. दरम्यान जयस्तंभ चौक, गांधी प्रतिमा, गोरेलाल चौक, नेहरू पुतळा, असे मार्गक्रमण करीत स्वच्छता रन करण्यात आला.  महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. पंकज रहांगडाले यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ श्री अतुल गजभिये यांनी स्वच्छता शपथेचे वाचन केले. याप्रसंगी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवरील घोषणा दिल्या. दरम्यान प्रशासकीय भवन समोर स्वच्छतेवरील मार्गदर्शनाच्या कार्यक्रम पार पडला. स्वच्छता ही सेवा कार्यक्रमांतर्गत स्वच्छतेची लोक चळवळ निर्माण करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार जिल्ह्यात विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. यासर्व उपक्रमांमध्ये नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोविंद खामकर यांनी केले. प्लास्टिक पर्यावरणासाठी फार हानिकारक आहे. तिच्या वापर टाळायला हवा. विद्यार्थ्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा. मी कचरा करणार नाही आणि कचरा होऊ देणार नाही, असा संकल्प घेण्याचे आवाहन माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केले.  स्वच्छता ही व्यक्तीचे आत्मदर्शन  घडविते.  आपण स्वच्छतेचे विविध कार्यक्रमा आयोजित तर करतोच मात्र आपण सर्वांनी शाश्वत स्वच्छतेवर भर द्यावा, असे मत गोंदिया पंचायत समितीचे सभापती श्री मुनेश रंहांगडाले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती शिक्षण व संवाद तज्ञ श्री अतुल गजभिये यांनी केले. कार्यक्रमात विस्तार अधिकारी पंचायत श्री आर. जे. बनसोड, श्री कार्तिक चव्हाण,  श्री चुनीलाल गावड,  विस्तार अधिकारी सांख्यिकी श्रीमती संगीता अग्रवाल, सहायक प्रशासन अधिकारी श्रीमती मंजुषा चौधरी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री आंबेडारे, शिक्षण विस्तार अधिकारी पी. पी. समरीत,  विस्तार अधिकारी श्री निमजे, सहाय्यक लेखा अधिकारी श्री. के. डी. गजभिये, कृषी विस्तार अधिकारी श्री पटले, श्री कटरे, माहिती शिक्षण व संवाद तज्ञ श्री राजेश उखळकर, मूल्यमापन व सनियंत्रण तज्ञ श्री विशाल मेश्राम, स्वच्छता तज्ञ अभियंता श्री सूर्यकांत रहमतकर,  शालेय स्वच्छता तज्ञ श्री भागचंद रंहांगडाले, मनुष्यबळ विकास तज्ञ कु. तृप्ती साकुरे, गटसमन्वय कु. करुणा डोंगरे, श्री उमेंद्र भगत, श्री. तेजप्रकाश पुंडे, कु. कांचन मेश्राम,  पंचायत समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी, तथा जे. एम. हायस्कूल, महावीर मारवाडी शाळा,  सरस्वती महिला विद्यालय,  मनोहर मुन्सिपल शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक स्वच्छता रन कार्यक्रमात सहभागी झाले होते.