आ. विनोद अग्रवाल: खरेदी केंद्रामध्ये येणा-या अडचणी दूर करा – आ.विनोद अग्रवाल*

. विनोद अग्रवाल:  खरेदी केंद्रामध्ये येणा-या अडचणी दूर करा – आ.विनोद अग्रवाल*
*आ.विनोद अग्रवाल यांनी अन्न व नागरी पुरवठा यांच्याकड़े केली मागणी*
          सारस न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी/गोंदिया : गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा असून बहुतांश सर्वच शेतकरी धान पिकाची लागवड करत असतात. जवळपास अनेकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. धान पीक निघाले असून शेतकरी बांधव बाजारात धान विक्रीसाठी धावपळ करीत आहे. तसेच धान खरेदी केव्हा सुरु होणार ही वाट पाहत आहेत व त्यामुळे शेतक-यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. दरवर्षी काही न काही अडचणी धान खरेदी साठी येतच असतात. सध्या गोंदिया भंडारा जिल्‍हातील शासकीय आधाभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्‍या करिता ५०० पैकी ५० केंद्राला मान्‍यता प्रदान करण्‍यात आलेली आहे. व धान खरेदी केंद्र सुरू करण्‍यास १ कोटीचे गहाणपत्रक व २० लक्ष ठेव असी तसेच प्रति क्‍विटंलवर १ किलो वरून अर्धा केलो घट देणे तथा ३० रू. वरून २० रू. कमीशन करने इत्‍यादी जाचक अटी शर्तीमुळे शासकीय आधारभूत धान खरेदी करणा-या संस्‍थानी धान खरेदी करण्‍यास नकार दिला आहे. अश्‍या अनेक समस्‍याचे निराकरण करण्‍यासाठी धान उत्‍पादक भागातील आमदाराची तातडीने बैठक लावून समस्या मार्गी लावण्यात याव्यात येणारी अशी मागणी आ.विनोद अग्रवाल यांनी अन्न व नागरी पुरवठा यांच्याकड़े पत्राद्वारे केली आहे.