गोंदिया,दि.28- गोंदिया जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा परिषद आपल्या गावी हा अभिनव उपक्रम जि.प.अध्यक्ष पंकज रहागंडाले यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदा आयोजित करण्यात आले असून या अभियानाचा शुभारंभ सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा(पळसगाव)येथील जिल्हा परिषद शाळेत 30 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे.
जि प अध्यक्ष पंकज रहागंडाले, उपाध्यक्ष इंजि.यशवंत गणवीर,अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंंभरे,कृषी व पशुसंवर्धन सभापती रुपेश कुथे,महिला व बालकल्याण सभापती सौ.सविता पुराम,समाजकल्याण सभापती सौ.पुजा सेठ,पंचायत समिती सडक अर्जुनीच्या सभापती सौ.संगिताबाई खोब्रागडे,उपसभापती शालींदर कापगते,जिल्हा परिषद सदस्य डाॅ.भुमेश्वर पटले यांच्यासह डव्वा जिल्हा परिषद गटातील पंचायत समिती सदस्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे समन्वय अधिकारी तसेच कार्यक्रमाचे संपुर्ण संनियंत्रण अधिकार हे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.जिल्हा परिषद आपल्या गावी या अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,जिल्हा परिषद पंचायत विभाग,जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा कृषी अधिकारी,जिल्हा कार्यक्रम समन्वयक मनरेगा,शिक्षण विभाग(प्राथ./माध्य),जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा समाजकल्याण अधिकारी,कार्यकारी अभियंता(ग्रामीण पाणी पुरवठा व बांधकाम विभाग) व संबधित तालुक्यातील गटविकास अधिकारी यांच्याकडे विविध जबाबदारी सोपवण्यात आले आहे.तसेच शासकीय योजनांचे स्टाॅल लावून जनतेला माहिती देण्यासोबतच आरोग्य शिबिरही आयोजित करण्यात येणार आहे.या उपक्रमातंर्गत संबधित गावातील नागरिकांनी आपल्या जिल्हा परिषदेकडील विभागाशी संबधित असलेल्या शासकिय योजनांचा लाभ घेण्यासोबतच काही तक्रारी असल्यास त्या घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन या अभियानाचे समन्वयक व सामान्यप्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी.आर.खामकर यांनी केले आहे.
Social Plugin