नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पामध्ये5 ते 7 जानेवारी दरम्यान दुसरे पक्षी सर्व्हेक्षण

गोदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये विविध अधिवासामध्ये राहणाऱ्या विविध पक्ष्यांच्या प्रजातींचे अन्वेषण व दस्तऐवजीकरण तसेच पक्षी विविधतेचा सर्व समावेशक अभ्यास करण्याकरीता दिनांक 5, 6 व 7 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये दुसरे पक्षी सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

         सदर पक्षी सर्व्हेक्षणात सहभागी होवू इच्छिणाऱ्या पक्षीप्रेमींचे दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 पासून ते 16 डिसेंबर 2023 रोजी रात्री 10 वाजतापर्यंत फक्त 50 जागेकरीता अर्ज स्विकारण्यात येतील व प्रति व्यक्ती 1600 रुपये याप्रमाणे फी आकारण्यात येईल. यासाठी अर्ज ऑनलाईन पध्दतीने https://forms.gle/b2ciEMmivjtDfnPo8 या लिंकवर रजिष्ट्रेशन करता येईल. त्यासाठी QR कोडवर आवेदन करण्याबाबतची सर्व माहिती उपलब्ध आहे. तरी नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पाचे दुसरे पक्षी सर्व्हेक्षण-2024 कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व इच्छुक पक्षीप्रेमींनी याबाबत नोंद घ्यावी, असे नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे उपसंचालक पवन जेफ यांनी कळविले आहे.