गोंदिया : गोंदिया शहरातील ज्या नागरिकांकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन असून ज्या ग्राहकांकडे पाण्याच्या देयकाची थकबाकी आहे अशा ग्राहकांना त्यांच्याकडील थकीत पाणी पट्टीचा रकमेचा भरणा करण्याचे आवाहन याद्वारे करण्यात येत आहे. तसेच जे ग्राहक त्यांच्याकडील पाणी देयकाच्या थकीत रकमेचा भरणा करणार नाहीत त्यांच्याकडील नळ जोडणी बंद करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या ग्राहकांकडे अवैध (विना मिटरची) नळ कनेक्शन आहेत त्या ग्राहकांना त्यांच्याकडील नळ जोडणी 15 दिवसांपर्यंत नियमीत करण्याकरीता शेवटची संधी देण्यात येत आहे. असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता एन.एस.गणवीर यांनी केले आहे.
Social Plugin