राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्राच्या वतीने 23 डिसेंबरला दु. 3 30 वाजता स्थानिक तेजस्विनी लॉन सडक अर्जुनी येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला महिला व बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे महाराष्ट्र शासन, खासदार प्रफुल्लभाई पटेल,आमदार मनोहर चंद्रिकापुरे, राष्ट्रीय सचिव, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तथा माजी आ.राजेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महासचिव गंगाधर परशुरामकर, जी. प. उपाध्यक्ष यशवंत गणवीर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष प्रेमभाऊ रहांगडाले, महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, जी. प.महिला व बालकल्याण सभापती पूजा सेठ उपस्थित राहणार आहेत . कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे वतीने करण्यात आले आहे.
Social Plugin