खा. सुनील मेंढे: लाख उत्पादन रोजगाराचे साधन व्हावे, यासाठी आराखडा कराखा. सुनिल मेंढे यांच्या नियोजन समितीच्या बैठकीत सूचना

.      सारस एक्सप्रेस गोंदिया 
जिल्ह्यातील जंगलव्याप्त भागात असलेल्या बफर झोन परिसरात पळस बोर आणि अन्य तत्सम झाडांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या माध्यमातून लाखाचे उत्पादन करून ग्रामीण भागातील महिला बचत गट व 
 नागरिकांना रोजगाराचे नवे साधन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विस्तृत आराखडा तयार करावा असे निर्देश खासदार सुनील मेंढे यांनी गोंदिया जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.
गोंदिया जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली आज गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी खा. सुनील मेंढे यांनी जिल्ह्यातील विकासाच्या आणि लोकहितच्या दृष्टीने काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. ओबीसी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाचा प्रश्न या बैठकीत चर्चेत आला. नियोजित जागांची पूर्तता करून दोन्ही वस्तीगृहांचे काम सुरू करण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. गोंदिया शहरातील सिटीसर्वे चे काम जिल्हा प्रशासनाने प्राधान्याने घ्यावे, मानव विकास अंतर्गत विद्यार्थ्यांची ग्रामीण भागातून शाळेपर्यंत जाण्याची सोय सुरळीत व्हावी म्हणून गाड्यांच्या संख्येत वाढ करण्याची बाबही या बैठकीत खासदारांनी उपस्थित केली.
गोंदिया येथील एमआयडीसी तील 125 एकराचा भूखंड एका खाजगी कंपनीला देण्यात आला आहे. भूखंड केंद्र सरकारला हस्तांतरित करून त्या ठिकाणी लोकाभिमुख प्रकल्प सुरू करण्याची मागणी यावेळी खासदारांनी केली. लाख उत्पादनातून ग्रामीण भागात समृद्धी येऊ शकते. बफर झोन भागातील यांच्या मदतीने लाखाची उत्पादन वाढविण्यास आणि यासाठी ग्रामीण भागातील लोकांना काम दिल्यास रोजगाराचा नवा मार्ग सापडू शकतो. त्यामुळे या अनुषंगाने विस्तृत आराखडा तयार करण्यात यावा आणि होऊ घातलेल्या दिशा समितीच्या बैठकीत तो ठेवला जावा असे निर्देश खासदारांनी उपवनसंरक्षक, महिला आर्थिक विकास मंडळाचे समन्वयक आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले.या बैठकित
मा ना धर्मराव बाबा आत्राम - पालकमंत्री गोंदिया मा अशोक नेते -अध्यक्ष दिशा समिती व खासदार गडचिरोली-चिमूर
मा पंकज जी रहांगडाले- जिल्हा परिषद अध्यक्ष मा विजय रहांगडाले - आमदार
मा विनोद जी अग्रवाल -आमदार गोंदिया विधानसभामा परिणय जी फुके - माजी मंत्री मा राजकुमार बडोले - माजी मंत्री
मा गोपाल जी अग्रवाल - माजी आमदार
मा राजेंद्र जैन - माजी आमदार
मा अभिजित वंजारी - आमदार विधानपरिषदमा चिन्मय गोतमारे - जिल्हाधिकारी गोंदियामा अनिल पाटील- मुख्य कार्यकारी अधिकारी जि प गोंदिया
मा निखिल पिंगळे - पोलीस अधीक्षक गोंदियाआदी उपस्थित होते