तिरोडा:- तिरोडा तालुक्यात आरोग्याची सुविधा उपलब्ध होण्याच्या हेतून उपजिल्हा रुग्णालय असून यामध्ये गरजू रुग्ण उपचार घेत असतात ताल्युक्यात पात्र दिव्यांगाना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता दिव्यांग बांधावाना के.टी.एस.जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे जावे लागत असे त्यामुळे ३० कि.मी.अंतरावर ये-जा करण्याकरिता अडचण उद्भवत होती सदर प्रमाणपत्र मिळण्याची सोय तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध करण्याबाबत तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांचेकडे मागणी केली असता तात्काळ वरिष्ठ कार्यालयाला निर्देश देवून उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे प्रत्यके महिन्याच्या पहिल्या व तिस-या गुरुवारला अपंग प्रमाणपत्र मिळण्याकरिता सोय उपलब्ध करण्यात आल्याबाबत आमदार महोदयांकडून माहिती प्राप्त झालेली आहे यामुळे तिरोडा तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना आता तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांग प्रमाणपत्र मिळणार आहे.
Social Plugin