नागरिकांना वाहतुकीची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सडक अर्जुनी तालुक्यामध्ये अनेक रस्त्यावर पुलाचे बांधकाम करण्यात आले. सदर रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी प्रशासकीय मंजुरी प्रदान करून 22 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता .त्यानुरूप अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील सडक अर्जुनी तालुक्यात जवळपास मागील दोन वर्षापासून मोठ्या पुलाचे बांधकाम करून ते पूर्ण झाले होते बांधकाम पूर्ण झालेल्या पुलाचे लोकार्पण कार्यक्रम प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दि.25 जानेवारी रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम याचे शुभहस्ते, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यात वडेगाव माहुली रस्त्यावरील घोगरा घाट पुल, खजरी ते गिरोला रस्त्यावरील म्हसवा नी येथील पूल, खजरी ते गिरोला मार्गावरील खोडशिवनी येथील पूल, डव्वा घोटी घटेगाव रस्त्यावरील पूल, पळसगाव ते मुरपार राम रस्त्यावरील पूल, भोयरटोला ते बकिटोला रस्त्यावरील पुलाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री यांनी सांगितले या ठिकाणी पुलाचे जी कामे पूर्ण झाली आहेत त्या सर्वच पुलाच्या लोकार्पण सोहळ्याचा मुहूर्त आमदारांनी अतिशय कमी दिवसात काढून या ठिकाणी च्या कामाचे आज लोकार्पण होत आहे त्यामुळे या क्षेत्रातील नागरिकांना वाहतुकीसाठी कसल्याही प्रकारचं त्रास भविष्यात सहन करावा लागणार नाही या क्षेत्रात अनेक रस्त्यावर पुलाचे कार्य पूर्ण झाल्याने निश्चितच याचा फायदा जनतेला होणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील विद्युत पुरवठा संदर्भातील समस्या असो की इतर समस्या सर्व समस्या मार्गी लावण्याचे काम या क्षेत्राचे आमदार महोदया सोबत जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पूर्ण करणार. यावेळी जी. प. सदस्या सुधाताई रहांगडाले, राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते तथा खोडशिवणी येथील सरपंच गंगाधर परशुरामकर, पंचायत समिती सदस्य डॉ. रुखिराम वाढई, शिवाजी गहाने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा युवा उपाध्यक्ष दानेश साखरे, कार्यकारी अभियंता आशिष आवळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा महासचिव डी.यू.रहांगडाले, पोलीस पाटील संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भृंगराज परशुरामकर, माजी जी प . उपाध्यक्ष छायाताई चव्हाण,तालुका राष्ट्रवादी युवा अध्यक्ष राहुल यावलकर,माजी प. स. सदस्य इंदूताई परशुरामकर , उमराव मांढरे इंजि. पटले,सरपंच प्रशांत बाल सलवार ,प्रमोद लांजेवार,ईश्वर कोरे,माजी सरपंच सुभाष कापगते, मुन्ना देशपांडे, यांचे सह सरपंच , उपसरपंच, ग्रामसेवक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Social Plugin