अर्जुनी/मोरगाव तालुक्यात सध्या रब्बी हंगाम खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यात धानाची लागवड खूप मोठ्या प्रमाणात शेतकर्यांनी केलेली आहे. इतर पिकांच्या तुलनेत धान पिकाला पाण्याची अधिक आवश्यकता असते. आठ तास वीज पुरवठा मिळत असल्याने पाणी शेतीला पुरत नसते. त्यामुळे धान पीक धोक्यात येतो. त्यामुळे आठ तास वीज पुरवठा करण्याऐवजी बारा तास वीजपुरवठा करण्यात यावा व दिवसाच्या भारनियमन ऐवजी रात्री भारनियमन करण्यात यावा अशा मागण्यांचे निवेदन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना शेतकर्यांनी दिले.
अलिकडे शेतीमधील भागात जंगली प्राण्यांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात आहे. रात्रीच्या वेळी शेतकरी शेतात जाण्यास भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकर्यांना दिवसा बारा तास वीज पुरवठा करण्यात यावा व दिवसाच्या भारनियमन ऐवजी रात्रीच्या वेळी भारनियमन करण्यात यावा अशा प्रकारची मागणी शेतकर्यांनी केलेली आहे. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी या शेतकर्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री यांच्याशी चर्चा करून सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही दिली.
या शेतकरी शिष्टमंडळात दुर्योधन मैंद माजी उपसभापती पंचायत समिती, लहुजी दोनाधकर,हेमराज ठाकरे, शेषराव ठाकरे, भोजराज निमकर, नवलाज ठाकरे, मार्तंड झोडे, पुरुषोत्तम राऊत, पंढरी दोनाडकर,आनंदराव गेडाम, विलास नंदागवळी, राजेश बालबुढे,रामू झोडे, नामदेव झोडे, पंढरी भोंडे, यादवराव गहाणे, हिरालाल ठाकरे, देवराव पुराम, आसाराम निमकर प्रामुख्याने उपस्थित होते.
Social Plugin