व ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’चे 28 फेब्रुवारीला यवतमाळ येथे वितरण
सारस न्यूज एक्सप्रेस
गोंदिया : केंद्र शासनाच्या ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेच्या 16 व्या हप्त्यापोटी 2 हजार रुपये आणि राज्य शासनाच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’च्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यापोटी 4 हजार रुपयांचा लाभ येत्या 28 फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्ह्यातील मौजे भारी येथे आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील सुमारे 88 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहेत. या समारंभात https://mpindiawebcast.nic.in या लिंकद्वारे सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नागपूर विभागीय कृषी सहसंचालक मिलींद शेंडे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने फेब्रुवारी 2019 पासून ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ (पीएम किसान) योजना सुरु केली आहे. या योजनेनुसार शेतकरी कुटुंबास रुपये 2 हजार प्रती हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रुपये 6 हजार त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. या योजनेचा माहे डिसेंबर-मार्च 2024 कालावधीतील 16 वा हप्ता प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 28 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 4.00 वाजता यवतमाळ जिल्ह्यातील मौजे भारी येथे आयोजित कार्यक्रमात वितरीत करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत राज्यातील भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई-केवायसी पूर्ण केलेल्या एकूण 87.96 लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात रुपये 1943.46 कोटींचा लाभ थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.
केंद्राच्या धर्तीवर राज्य शासनाने सुरु केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’ची अंमलबजावणी राज्यात सुरु असून शेतकरी कुटुंबास रुपये 2 हजार प्रती हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रुपये 6 हजार देण्यात येणार आहे. मौजे भारी येथील कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते या योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता एकूण 87.96 लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात रुपये 3800 कोटींचा लाभ थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.
‘पीएम किसान उत्सव दिवस’
केंद्र शासनाने 28 फेब्रुवारी 2024 हा दिवस संपूर्ण देशभर ‘पीएम किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार जिल्हा, तालुका व गावपातळीवर तसेच कृषी विज्ञान केंद्र, सामाईक सुविधा केंद्रांवर पीएम किसान उत्सव दिवस साजरा होणार असून ‘पीएम किसान सन्मान निधी’ व ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’च्या लाभ वितरण समारंभात लिंकद्वारे शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Social Plugin