उद्या सरपंच मेळाव्याचे आयोजन

              सारस न्यूज एक्सप्रेस 
गोंदिया,दि.29-गोंदिया जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्यावतीने उद्या शुक्रवार 1 मार्च रोजी सकाळी 9 वाजता जिल्हास्तरीय सरपंच मेळावा व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन न्यु ग्रीन लॅान लॅन्ड येथे आयोजित करण्यात आले आहे.या मेळाव्याचे उदघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.मुख्य मार्गदर्शक म्हणून अति.मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.तानाजी लोखंडे,प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा श्रीमती प्रमिला जाखलेकर तर विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती इंजि.यशवंत गणवीर,अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे,महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम,कृषी व पशुसंवर्धन सभापती रुपेश कुथेे,समाजकल्याण सभापती पुजा सेठ यांच्यासह सर्व पंचायत समितीचे सभापती,जि.प.गटनेता,जिल्हा परिषद सदस्य उपस्थित राहणार आहेत.
विशेष म्हणजे या सरपंच मेळाव्याला मार्गदर्शन करण्याकरीता गुजरात राज्यातील ग्रामपंचायत संघटना कच्छचे अध्यक्ष सुरेश चांगा यांना आमंत्रित करण्यात आले आहे.त्यांच्यासोबतच वर्धा जिल्ह्यातील आदर्श ग्रामसंसद मिर्झापूर,नेरीचे सरपंच बाळाभाऊ सोनटक्के हे सुध्दा मार्गदर्शन करणार आहेत.दुपारी 3 वाजता आर.आर.(आबा)पाटील सुंदर गाव योजना व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छा अभियान सन 2022-23 चे जिल्हा व तालुकास्तरावरील विजयी ग्रामपंचायतीना बक्षिस वितरीत करण्यात येणार आहे.सायकांळी 4 वाजता जि.प.अध्यक्ष पंकज रहागंडाले यांचे अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.या सरपंच मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य  कार्यकारी अधिकारी गोविंद खामकर  यांनी केले आहे.