आमची शाळा आदर्श शाळा उपक्रमात जि.प. प्राथमिक शाळा जानाटोला तालुकास्तरीय मूल्यांकनात प्रथम क्रमांकाची मानकरी🌹

       सारस न्यूज एक्सप्रेस गोंदिया 
गोरेगाव-ग्रामीण  भागातील शिक्षणाचा  दर्जा  उंचावण्यासाठी आमची शाळा आदर्श  शाळा हा उपक्रम  जि. प. गोंदिया  आणि  अदानी फाउंडेशन  यांच्या संयुक्त  विद्यमाने  दरवर्षी  राबविला जातो. शिक्षणाचा  दर्जा  सुधारण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन,  गावकरी, शिक्षक  विद्यार्थी  यांच्या सहकार्याने  गावातील  शाळा  भौतिक  व गुणवत्तेत  दर्जेदार  व्हाव्यात  यासाठी  जि.प  गोंदियाचा  प्रयत्न  आहे.

          या उपक्रमातंर्गत  जि.प प्राथमिक  शाळा  जानाटोला पंचायत  समिती गोरेगाव  तालुकास्तरीय मूल्यांकनात  अव्वल  क्रमांकाची  मानकरी ठरली. अगदी अल्प  कालावधीत  शाळेचा कायापालट  करण्यात  शाळेचे मुख्याध्यापक  मा. यु. एन. डोलारे सर, सहा. शिक्षिका कु.एस. एन. घासले मॅडम  सौ. कोमल बिसेन  अध्यक्ष  शा.व्य.स  , सर्व  सदस्य,  मा. तेजेश्वरीबाई टेकाम  सरपंच , गावातील  सर्व  नागरिक,  युवा मंडळी यांचे सक्रिय  योगदान  मोलाचे ठरले.
    गोरेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख  मा. यु. एम .बोपचे  सर यांचे वेळोवेळी  मार्गदर्शन  लाभले.