लोकसभा निवडणुका जाहीर, आचारसंहितेमधील महत्त्वाचे 10 नियम कोणते?

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. एकूण 7 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. काल पासून आचारसंहिता लागू झालीय.

2024 : काल पासून लोकसभा निवडणुकीचा ( Lok Sabha Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. एकूण 7 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी आज निवडणुकांची घोषणा केली. या निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांना देशातील निवडणुकांची सविस्तर माहिती सांगितली. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत एका उमेदवाराला किती खर्च करता येणार आहे? आचारसंहितेमध्ये कोणत्या गोष्टीचं पालन करावं लागेल? पाहुयात आचारसंहितेमधील महत्त्वाचे 10 नियम. 


लोकसभा निवडणुकीबरोबरच आज ओडिशा, सिक्कीम, अरूणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारीखही जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या आजच्या घोषणेनंतर संपूर्ण देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. देशभरात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिले आहेत. आयोगाच्या याच नियमांना आचार संहिता असे म्हटले जाते. लोकसभा अथवा विधानसबा निवडणुकांदरम्यान या नियमांचे पालन करणे हे सरकार, नेतेमंडळी आणि राजकीय पक्षांसाठी बंधनकारक असते.

👉आचारसंहितेमधील महत्त्वाचे 10 नियम कोणते?

निवडणुकीत वैयक्तिक पातळीवर टीका नको

धार्मिक द्वेषपूर्ण विधाने केली जाऊ नयेत

कोणत्याही उमेदवाराला मतदारांना धमकावता येणार नाही

प्रचारसभा, रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्वपरवानगी गरजेची

नियमांच्या चौकटीत राहूनच काम करावं लागेल

उमेदवाराला धर्म, जात, पंथ याआधारे मतदान मागता येणार नाही

तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करता येणार नाही

निवडणुकांमध्ये कोणत्याही प्रकारची हिंसा होणार नाही याची काळजी घ्या
👉महराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार, कुठे कधी होणार मतदान?

१९ एप्रिल - रामटेक , नागपूर, भंडारा - गोंदिया, गडचिरोली- चिमूर, चंद्रपूर 

२६ एप्रिल - बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ- वाशिम, हिंगोली, नांदेड,  परभणी

७ मे - रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी - सिंधुदुर्ग, कोल्हापूर,  हातकंणगले 

१३मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड 
२०  मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर - पश्चिम मुंबई, उत्तर - पुर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई , दक्षिण मुंबई