भरत घासले
पिंडकेपार ग्रामपंचायत अंतर्गत कन्हारटोला, रिटटोली व पिंडकेपार येथील नळ धारकाना पाणीपुरवठा योजनेद्वारे नळाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. मात्र काही दिवसापासून पाण्याची कृत्रिम टंचाई भासत आहे .काय आहे कारण जरा थोडक्यात जाणून घेऊया
पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. पाण्याचा दुरुपयोग करू नये .असे म्हटले जाते मात्र पिण्याच्या पाण्याचां कसा दुरुपयोग होतो याचे उदाहरण अनेक गावात दिसून येत आहे. यामुळेच पाण्याची कृत्रीम टंचाई निर्माण होत आहे . पिंडकेपार गावात ही सुद्धा मागील काही दिवसापासून पाण्याची कृत्रिम टंचाई गावकऱ्यांना भासत आहे . गावाची लोकसंख्या 2011 च्या अनुसार 1700 च्या वर आहे पाणीपुरवठा योजनेद्वारा पिंडकेपार कन्हाटोला रीटटोली व पिंडकेपार येथील 200 नळधारकांना पाणीपुरवठा केल्या जात आहे .मात्र काही नळ धारक पाण्याचा दुरुपयोग करताना दिसत आहे . नळाद्वारे शेकडो लिटर पिण्याचे पाणी वाफ्यांना सोडले जाते हे प्रत्यक्षात निरीक्षणात आढळून आलेले आहे. शेकडो लिटर पाण्याचा दुरुपयोग केल्या जात आहे एवढ्या पाण्यामुळे कमीत कमी 100 लोकांना पाणी मिळू शकेल एवढा पाणी वाफ्यांना जात आहे. हे ही एक कृत्रिम पाण्याच्या टंचाईचे कारण आहे. जर पाण्याच दुरुपयोग टाळणे बंद झाले नाही येणाऱ्या दिवसात पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागणार आहे. यात तीळ मात्र शंका नाही.
👉पाणी टंचाईचे हे ही एक कारण
वर्ष 2022 _ 23 ला नळ धारकांची संख्या 120 होती त्यामुळे सर्वांना पिण्याचे पाणी योग्य प्रमाणात मिळत होते. मात्र 2022_23 मध्ये जल जीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबांना नळ कनेक्शन लावण्यात आलेले आहे .आज नळ धारकांची संख्या 200 च्या वर पोहोचलेली आहे . पाणी साठा तेवढाच परंतु नळ धारकांची सख्या दुप्पट झाल्याने पाण्याचा वापर हजारो लिटर ने अधिक वाढले आहे. अधिक वापर वाढल्याने पाण्याची कृत्रिम टंचाईचे हे ही एक कारण समोर येत आहे.
👉 कार्यवाही होऊ शकते
जे नळधारक पिण्याच्या पाण्याचा दुरुपयोग करीत आहेत असे निरीक्षणात जर सामोर आले तर सदर नळ धारकांच्या विरोधात प्रशासनाच्या वतीने कायद्यानुसार कारवाई करण्याची तरतूद आहे. या बाबीकडे संबंधितांनी विशेष लक्ष द्यावे.
👉रब्बीचे क्षेत्र वाढले
कटंगी जलाशयाच्या पाण्याने रब्बीच्या पिकांना सिंचाई केली जाते. दोन वर्षाच्या अगोदर रब्बीचे क्षेत्र कमी होते परंतु आता रब्बीचे क्षेत्र दोन पटीने वाढल्याने कटंगी जलाशयाचे पाणी झपाट्याने रब्बीला देण्यात येत आहे त्यामुळे जलाशयाची पातळी झपाट्याने कमी होत असल्याने विहिरी व बोरवेल ची पातळी सुद्धा खाली जात आहे . हे एक कारण आहे की पिण्याच्या पाण्याची टंचाई होत आहे.
👉आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याला त्रास देऊ नका
काही नळधारक पिण्याच्या पाण्याचा दुरुपयोग करीत असल्याची माहिती समोर येत आहे. स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांना त्रास देऊ नये याकडे संबंधित नळधारकांनी लक्ष द्यावे कारण की पाणी हे जीवन आहे पाणी नाही तर जीवन नाही.
*नळ धारकांना आव्हान*
पिंडकेपार ग्रामपंचायत च्या वतीने सर्व नळ धारकांना आव्हान करण्यात येत आहे की पाण्याचा वापर जपून करावे, पाण्याच्या दुरूपयोग करू नये, पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे , तिचे जतन करणे आमचे आद्य कर्तव्य आहे., वेळेवर टॅक्स भरून ग्रामपंचायतला सहकार्य करावे.
Social Plugin