जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
येथून १२ किलोमीटर अंतरावरील फत्तेपूर येथे घरांवर दगड मारण्याचा आणि त्यातून पसरलेल्या अंधश्रद्धेचा, दहशतीचा प्रकार अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अखेर निपटारा केला. त्या घटनेतील संशयिताला ताकीद देत न्यापुढे असे घडल्यास कारवाई केली जाईल, असे सांगून या प्रकारावर पडदा पाडला.
गेल्या सहा दिवसांपासून फत्तेपूर येथील देशभ्रतार व खोब्रागडे कुटुंबासह सहा घरांवर सतत दगड येत होते. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून संध्याकाळी सात वाजेपासून ते पहाटे तीन वाजेपर्यंत दगड, कवेलू, विटाचे तुकडे येत होते.
कोणत्याही व्यक्तीला दगड लागत नव्हते. परंतु, हा भूतप्रेताचा चमत्कार आहे, आत्मा दगड फेकत असला पाहिजे, या समजूतीने त्या भागात दहशत पसरली होती. त्या संबंधित घरातील रहिवाशांची रात्रीची झोप नष्ट झाली होती. दगड कुठून येतात हे शोधण्यासाठी रात्री रहिवाशांनी जागरण व गस्त सुरू केली होती. या घटनेमागील सत्य शोधून काढण्यासाठी गंगाझरी पोलिस व उपसरपंच यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार केली. अंनिसचे यशवंत कांबळे, प्रकाश धोटे व मृणाल कावळे यांनी फत्तेपूरला घटनास्थळी भेट देऊन निरीक्षण केले.
पीडित कुटुंबे वेगळी आहेत
आकाराचे दगड, विटाचे तुकडे घरावर व टिनावर पडलेले दाखविले. हा सर्व भूताप्रेताचा चमत्कार असल्याचा सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अंनिस सदस्यांनी भूतप्रेताचे अस्तित्व मुळीच नसल्याचे सांगितले. भूताप्रेतांनी जर दगड फेकले असते तर त्यांनी पाच-दहा किलो वजनाचे दगड फेकले असते. हे सर्व फेकलेले दगड सामान्य माणसाच्या हातात बसतील याच आकाराचे असल्याचे त्यांनी गावकऱ्यांना समजाविले व यामागे जिवंत व्यक्ती असल्याची कल्पना दिली. समजाविणे सुरू असतानाच घरावर चार-पाच दगड आले व अंनिस सदस्यांनी दगड फेकणारा सापडल्याचे
जाहीर केले. त्यानंतर जवळपास दीड
सर्व भीतीग्रस्त गावकऱ्यांनी अंनिस सदस्यांना थांबून ठेवले. दगड फेकणाऱ्या संशयित व्यक्तीला अंनिस सदस्यांनी स्वतः जवळच बसून ठेवले. अशात-हेचे गावकऱ्यांत दहशत पसरविणारे कोणतेही कृत्य जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा असून, कारवाई झाल्यास जमानत कोर्टातून होईल व गुन्हा सिद्ध झाल्यास सहा महिने ते सात वर्षे शिक्षा असून पाच हजार रुपये ते ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची रक्कम भरावी लागेल, याची कल्पना संशयित व्यक्तीला दिली. त्या दिवसापासून एकही घटना गावात झाली नाही. गावकऱ्यांनी दगडफेक थांबल्याबद्दल व दहशतीपासून मुक्ती दिल्याबद्दल अंनिसचे आभार मानले.
Social Plugin