: देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून सत्ताधाऱ्यांसर विरोधकही निवडणूक प्रचाराला लागले आहेत. यादरम्यान केंद्र सरकराने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजुरांच्या संदर्भात मोठी घोषणा केली आहे. मनरेगा अंतर्गत मजुरांच्या मजुरीत ३ ते १० टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे मनरेगा मजूरांना पूर्वीपेक्षा जास्त मजुरी मिळणार आहेत. गुरुवारी (ता. २८) सरकारने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. मात्र, ही वाढ १ एप्रिलपासून लागू होणार आहे.
या नव्या घोषणेमुळे महाराष्ट्रातील मजुरांच्या मजुरीत २४ रूपयांहून अधिकची वाढ होणार आहे. तर गोव्यातील मजुरांच्या मजुरीत सर्वाधिक ३४ रुपयांची वाढ झाली आहे. मनरेगा अंतर्गत मजुरीतील ही वाढ प्रचलित दराच्या (NREGS) १०.५६ टक्के आहे. तर सर्वाधिक कमी वाढ उत्तराखंडमधील मजुरीत झाली आहे.
राज्यनिहाय वेगळी मजुरी
लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने शेकऱ्यांसह सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी अनेक घोषणा केल्या होत्या. यापाठोपाठ आता मजुरांना खुश करण्यासाठी मोदी सरकारने घोषणा केली आहे. सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) अंतर्गत येणाऱ्या मजुरांच्या मजुरीत वाढ केली आहे. यामुळे या योजनेतंर्गत काम करणाऱ्या मजुरांना जास्त वेतन मिळणार आहे.
Social Plugin