*भंडारा प्रतिनिधी*
भंडारा:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकसीत राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करीत आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सर्व नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहोत. आगामी होऊ घातलेली लोकसभेची निवडणूक स्वप्नपूर्तीसाठीची दिशा ठरविणारी आहे. त्यामुळे आम्ही सर्व महायुतीचा उमेदवार प्रचंड मोठया मताधिक्याने विजयी करु आणि 400 पार चा नारा सार्थ ठरवू, असे मत महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी मंगळवारी भंडारा शहरातील एका हॉटेलच्या सभागृहात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलतांना व्यक्त केले. भंडारा लोकसभा क्षेत्राचे भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे हे उद्या बुधवार दिनांक 27 मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी मंगळवारी महायुतीतील सर्व घटक पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येत पत्रकार परिषद घेतली.
यावेळी संबोधित करताना भाजपचे उमेदवार असलेले खा. सुनील मेंढे म्हणाले, मी पक्षातील सर्व वरिष्ठांचा आभारी आहे.आज त्यांनी पून्हा एकदा माझ्यावर विश्वास टाकून उमेदवारी दिली. हा उमेदवारीचा मार्ग मतदार संघातील जनतेच्या प्रेमातूनही सुकर झाला. देशाला सर्वोच्च स्थानी नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. मागील पाच वर्षात आपणच त्यांच्या या कार्याला हातभार लावण्याची संधी दिल्याने, पून्हा एकदा पंतप्रधानांचे हात बळकट करण्याची वेळ आली आहे. सृदृढ सरकार आणि सशक्त राष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले मतरुपी आशिर्वाद यावेळीही मला हवे आहेत, असेही खा. सुनील मेंढे म्हणाले. विरोधकांच्या देश विघातक राजकारणाला हद्दपार करण्याची ही वेळ असल्याचेही ते म्हणाले. उमेदवार म्हणून मी उद्या (बुधवारला) 27 ला नामांकन अर्ज दाखल करणार आहे.यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल व महायुतीतील घटक पक्षाचे सर्व नेते उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.
पत्रकार परिषदेला आ विजय रहांगडाले, आ..नरेंद्र भोंडेकर, माजी आ.डॉ.परिणय फुके, माजी आ.बाळा काशिवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, बाळा अंजनकर, धनंजय दलाल, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे, प्रदिप पडोळे, शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल गायधने, आशू गोंनाडे उपस्थित होते.
Social Plugin