चार नक्षली सदस्य ठार झाल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसल्याचे बोलल्या जात आहे.

गडचिरोली : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घातपात घडविण्यासाठी तेलंगणाहून गडचिरोलीत दाखल झालेल्या ४ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. मंगळवारी पहाटे अहेरी तालुक्यातील कोलामार्का जंगल परिसरात ही चकमक उडाली. यात तेलंगणातील मंगी इंद्रावेल्ली आणि कुमरामभीम येथील नक्षल्यांच्या विभागीय सचिव सदस्य वर्गिश, सिरपूर-चेन्नूर क्षेत्र समितीचे सचिव मगटू, सदस्य कुरसंग राजू, कुडीमेट्टा व्यंकटेश हे चार नक्षलवादी ठार झाले. चौघांवर एकूण ३६ लाखांचे बक्षीस होते.