डीईसीची गोळी करी हत्तीरोगाची होळी " या घोषणांनी शहर दुमदुमले सामुदायिक औषधोपचार मोहीम प्रभात फेरीने जनजागृती

           सारस न्यूज एक्सप्रेस 
गोंदिया(दि.2४ मार्च)- राष्ट्रीय हत्तीरोग कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात दि. 26 मार्च ते 05 एप्रिल 20 दरम्यान हत्तीरोग आजारावर प्रतिबंधक सामुदायिक औषधोपचार मोहीम गोंदिया, तिरोडा, गोरेगाव व अर्जुनी मोरगाव या चार तालुक्यात राबवली जाणार आहे.जिल्हा आरोग्य प्रशासन, जिल्हा हिवताप विभाग व राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या एकत्रित सहकार्याने हत्तीरोग दुरीकरण मोहिमेच्या अनुशंगाने दि.23 शनिवारी रोजी जिल्हाधिकारी प्रजीत नायर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानथंम यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हास्तर, चारही तालुक्यातील  प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रस्तरावर जनजागृतीपर प्रभात फेरी काढण्याचे आयोजन करण्यात आले. 
वुचेरेरिया बॅक्रोफटाय व ब्रुग्रीया मलायी नावाच्या परजीवी जंतुमुळे हत्तीरोग हा आजार होतो आणी त्याचा प्रसार क्युलेक्स क्विंक्वीफेशिएटस या डांसामार्फत होतो. त्यांचे प्रजनन घाण व प्रदुषित पाण्यात होते. तरि सर्व लोकांनी जनजाग्रुतीने डासोत्पती स्थाने नष्ट करावे व घाण पाण्याचा निचरा व्यवस्थित होइल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.लोकांनी जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे मोहीम कालावधीत वाटप केलेल्या गोळ्या खाल्यास हत्तीपाय आजारावर नियंत्रण करणे शक्‍य असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी या प्रसंगी म्हटले आहे.
हत्ती रोगाचा प्रसार डासांमार्फत होतो. दूषित व्यक्तीस डास चावला असता त्याच्या शरीरातील मायक्रो फायलेरिया रक्ताबरोबर डासांच्या शरीरात प्रवेश करतात. डासांच्या शरीरात त्याची वाढ व विकास होऊन ते संसर्गक्षम बनतात. डासांच्या सोंडेतून असा डास निरोगी माणसाला चावला कि त्या संसर्गक्षम सुक्ष्म अळ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. माणसाच्या शरीरात प्रवेश होताच त्या सूक्ष्म अळ्या लसीका वाहिनीत प्रवेश करतात आणि साधारणतः सहा महिन्याच्या कालावधीत परिपक्व होतात. लसिका वाहिनीत प्रवेश करताच कालांतराने पायाला सूज होऊन त्यांची वाढ होते. डासांवर नियंत्रण , घाण नालिचे पाण्याचे नियोजन व मोहीम कालावधीत वाटप केलेल्या गोळ्या खाल्यास हत्तीपाय आजारावर नियंत्रण करणे शक्य असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण  यांनी या प्रसंगी म्हटले आहे.
जिल्हा आरोग्य प्रशासन व जिल्हा हिवताप विभाग यांच्या एकत्रित सहकार्याने केटीएस सामान्य रुग्णालय येथे जिल्हास्तरीय जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन दि. 23 मार्च रोजी करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,जिल्हा क्षयरोग केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण , गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राम वर्ठी यांनी हिरवी झेंडी दाखवुन रॅलीचे उदघाटन केले. प्रभातफेरी केटीएस सामान्य रुग्णालय येथून ईंदिरा गांधी स्टेडियम मैदान-बाजार चौक-जयस्तंभ चौक भागात प्रभातफेरी काढण्यात आली. डीईसीची गोळी करी हत्तीरोगाची होळी ,वर्षातुन एकदाच गोळ्या घेण्याचे नियम पाळा तरच हत्तीरोगाला बसेल आळा,ना शाप है-ना पाप है हत्तीरोग तो मच्छरोका प्रताप है, सार्वत्रिक औषधोपचाराची कास धरु हत्तीरोगावर मात करु असे विविध संदेश देत जनजागृती करण्यात आली.
प्रभातफेरीत बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजने विद्यार्थी , दृष्टी अशासकीय संस्थेचे कर्मचारी, शहरी भागातील आशा सेविका, तसेच केटीएस विभाग व हिवताप विभाग कार्यालयाचे अधिकारी व स्टाफ प्रामुख्याने उपस्थित होते. प्रभातफेरी दरम्यान बँनर द्वारे जनजागृती तसेच हत्तीरोग आजाराबाबतचे पॉम्पलेटचे वाटप करण्यात आले.