*सारस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क*
नागपुर जील्हातील सावनेर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीने रद्द केल्याने त्यांचा उमेदवारी अर्जही रद्द करण्यात आला आहे. जात प्रमाणपत्र रद्द ठरविण्यात आल्याने आता रश्मी बर्वे यांचे जिल्हा परिषदेचे सदस्यत्वही रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रामटेक लोकसभा मतदार संघ हा अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता राखीव असून यासाठी कॉग्रेस पक्षाने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांना उमेदवारी जरी दिली असली तरी जात वैधता प्रमाणपत्र खोट्या दस्ताऐवजाच्या आधारावर मिळविल्या बाबतची तक्रार झाल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त यांनी रश्मी बर्वे यांना नोटीस बजावून प्रकरण प्रलंबीत ठेवले
होते. रश्मी बर्वे यांच्या माहेरचे आडनाव सोनेकर असून त्यांनी जात पडताळणी अधिकाऱ्या सामोर दिलेल्या माहिती नुसार त्यांचे वडील व आजोबा नरखेड मधील मौजा खरसोली येथील रहीवासी असल्याचे नमुद केले आहे. मात्र खरसोली येथील पोलिस पाटील यांनी आपल्या जबाबात असे सांगीतले की, या गावामध्ये सोनेकर नावाचे कोणी रहीवासी नव्हते किंवा ते तिथे रहात सुद्धा नव्हते. दुसरीकडे पोलीस विभागाच्या अहवालानुसार बर्वे यांनी आपल्या प्रतिज्ञा पत्रात वडील निरक्षर असल्याचा दावा केला आहे. मात्र पोलिसांनी प्रत्यक्ष त्यांच्या वडीलांची म.प्र. येथील शाळा गाठून तिथे चौकशी केली असता ते पांढुर्णा येथील हिवरा सेनाडवार येथील सरकारी प्राथमिक शाळेतून 5 वी व वडचिचोली येथून 6 वी चे शिक्षण घेतल्याचे आढळले. तसेच नागपूर ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेने विविध जागी जावून
पडताळणी व विचारणा केली असता रश्मी बर्वे यांचे माहेरचे नावं रिना सोनबा सोनेकर असे आढळले. रश्मी बर्वे यांनी महाराष्ट्र येथील रहीवासी असल्याचे दाखविण्या करीता व जाती प्रमाणपत्र बनविण्याकरीता खोटी वंनशवळी तयार करून नागपूर जिल्हयातील खरसोली येथील रहीवासी असल्याचे दाखविले. परंतू त्यामुळे मध्य प्रदेशातील असल्याचे कागदपत्रावरून दिसत होते. यासाठी त्यांनी खोटी वंशावळी दाखविल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यतावर्तविली होती. सन 2014 मध्ये सावनेर विधान सभेच्या
निवडणूकीच्या नांमंकन पत्र भरण्याची मुदत संपल्या नंतर त्या वेळचे भारतीय जनता पार्टी चे उमेदवार सोनबा मुसळे यांचे नामांकन निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्द ठरविले होते. अखेर जिल्हा जात पडताळणी समितीने दि. 28 मार्च रोजी रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द ठरविण्यात आल्याने आता रश्मी बर्वे यांचे जिल्हा परिषदेचे सदस्यत्वही रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आल्यानंतर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांच्या उमेदवारी अर्जावरही आक्षेप घेण्यात आला. श्यामकुमार यांनी जोडलेला एबी फॉर्म चुकीचा असल्याचा आक्षेप शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांनी घेतला. यावर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी श्यामकुमार बर्वे यांचा अर्ज वैध ठरविला व ते काँग्रेसचे उमेदवार झाले आहे.
Social Plugin