माजी पंचायत समिती सदस्याचे पाणी टंकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन....15 व्या वित्त आयोग कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आंदोलनकर्त्याचा आरोप सारस न्यूज एक्सप्रेस

       सारस न्यूज एक्सप्रेस गोंदिया 
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील एकोडी ग्रामपंचायत अंतर्गत सन 2020-21 व 2021-22 या वर्षात झालेल्या 15 व्या वित्त आयोग, जनसुविधा, नागरी सुविधा, मनरेगा अंतर्गत झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार माजी पंचायत समिती सदस्य जे. पी. बिसेन यांनी अनेक वेळा केली . तक्रारारीवर तोडगा नाही निघाल्यास पानी टंकीवरून उडी घेण्याचा इशारा ही  बिसेन यांनी दिला होता. तरी पण याकडे दुर्लक्ष केल्या गेले. अखेर माजी पंचायत समिती सदस्य बिसेन यांनी आज बुधवारला एकोडी येथील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन सुरू केले आहे.


सविस्तर वृत्त असे की माझी पंचायत समिती सदस्य जे पी बिसेन यांनी आरोप करत ग्रामपंचायतच्या विरोधात संबंधित विभागाला तक्रार केली होती की एकोडी ग्रामपंचायत अंतर्गत सन 2020 21 व 2021 22 या आर्थिक वर्षात पंधरावा वित्त आयोगा अंतर्गत अनेक कामे करण्यात आले मात्र या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार कऱण्यात आले. केलेल्या तक्रारीची चौकशी करून नियमा नुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारीच्या माध्यमातून करण्यात आली. मात्र संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष करीत कोणत्याच प्रकारची चौकशी केली नाही असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. तसेच तक्रारदाराने इसारा दिला होता की जर  चौकशी न झाल्यास आंदोलन करण्यात येईल .अखेर माजी पंचायत समिती सदस्य बिसेन यानी आज बुधवार ला पाण्याच्या टंकी वर चढवून शोले स्टाईलने आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनकर्त्यांनी निर्णय घेतला की जोपर्यंत चौकशी होणार नाही तोपर्यंत पाणीच्या टाकीवरून उतरणार नाही. या भूमिकेमुळे प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले आहे. आता  यावर काय तोडगा प्रशासन काढतो याकडे सर्वोच्च लक्ष लागून आहे.