रामनवमीच्या शुभमुहूर्तावर 17 एप्रिल रोजी सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान येथे सर्वधर्मीय सामूहिक विवाहाचे आयोजन**एकूण जोडपी होणार विवाहबद्ध, आतापर्यंत 72 जोडप्यांची नोंदणी**नवरात्रोत्सवात 1121 दिवे प्रज्वलित*

      सारस न्यूज एक्सप्रेस 
     जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया : 
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा 17 एप्रिल 2024 रोजी रामनवमीला श्री सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान बघेडा/तेढा यांच्या वतीने सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये आतापर्यंत ७२ जोड्यांची नोंदणी झाली असून ८१ जोड्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दरवर्षी रामनवमीच्या शुभ दिवशी कोणतेही शुल्क न घेता आयोजित सामूहिक विवाहाचे हे सलग ३२ वे वर्ष आहे. विवाह करणाऱ्या प्रत्येक वर- वधू ना आवश्यक जीवनाशक वस्तु वस्त्र तसेच सोन्याचे चे मंगळसूत्र देण्यात येते. वेळ आणि पैशांची बचत करण्यासाठी सामूहिक विवाह नोंदणी करून करा असे आवाहन संस्थे चे अध्यक्ष आमदार विनोद अग्रवाल, सचिव जिल्हा परिषद सदस्य डॉ.लक्ष्मण भगत उपाध्यक्ष भैयालाल सिंदराम, कोषाध्यक्ष विश्वनाथ असाटी, सह सचिव कुशनजी घासले, सदस्य श्री डॉ जितेंद्र मेंढे शालिकराम उईके, सखाराम सिंदराम, दिलीप खंडेलवाल, राहुल अग्रवाल आणि मंदिर चे पुजारी पंडित अयोध्यादास जी महाराज यांनी केले आहे.
दरवर्षी अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च सन्मान सामाजिक न्याय विभागाचा फुले, शाहू, आंबेडकर पुरस्कार प्राप्त करणारी मध्य भारतातील पहिली धार्मिक संस्था आहे. ज्यामध्ये सर्व धर्मांची समानता पाळून कार्य केले जाते. जगाच्या कल्याणात सर्वांचे कल्याण सर्वोपरि आहे. मांडोदेवी देवस्थान हे मध्य भारतातील प्रसिद्ध पर्यटन आणि तीर्थक्षेत्र आहे. ज्यामध्ये दररोज 3 ते 4 हजार भाविक व पर्यटक भेट देतात. येथे ५० हून अधिक दुकाने आणि हॉटेल्स असून रोजगार प्राप्त करत आहेत. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून दरवर्षी आरोग्य सेवा व इतर मार्गदर्शन शिबिरांसाठी ही संस्था प्रसिद्ध आहे. दररोज विवाह सुविधा उपलब्ध असून यामध्ये दरवर्षी सुमारे ५०० विवाह संपन्न होतात. आजपर्यंत या संस्थे मार्फत हजारोहून अधिक आंतरजातीय विवाह संपन्न झाले आहेत.