सारस न्यूज एक्सप्रेस गोंदिया:
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुसार भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. सदर निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे,
63-अर्जुनी मोरगाव व 66-आमगाव विधानसभा मतदारसंघात मतदानाची वेळ सकाळी 7 वाजेपासून ते दुपारी 3 वाजतापर्यंत राहणार असून 64-तिरोडा व 65-गोंदिया विधानसभा मतदारसंघात मतदानाची वेळ सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजतापर्यंत राहणार आहे असे जिल्हाधिकारी व निवडणुक अधिकारी प्रजीत नायर यांनी सांगितले आहे.
Social Plugin